सरसकट कर्जमाफीवर शेतकर्‍यांची फुली

0
नाशिक | दि. २६ प्रतिनिधी- आर्थिक शिस्त बिघडवणार्‍या कर्जमाफी या प्रकारामुळे शेतकरी आणि सहकारी बँकही डबघाईस आली आहे. पिकांना हमीभाव, उत्पन्न खर्चातील तुटवडा भरून काढण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या डाईवर कर्जाचा डोंगर राहणार नाही. तसेच शासन आणि बँकांनाही आर्थिक झळ बसणार नाही.
त्यामुळे सध्या बँकांनी पीककर्ज वाटप करावे. तसेच ज्या शेतकर्‍यांकडून शक्य आहे त्यांच्याकडून वसुली करून थकबाकीचे प्रमाण कमी करावे, असा कल जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर उमटू लागला आहे.

शासनाने कर्जमुक्ती द्यावी यासाठी सत्तेतील शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. पूर्वी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून कॉंगे्रस, राष्ट्रवादी आणि शेकाप आदी पक्षांनी शेतकरी कर्जमाफीसाठी शासनाविरोधात आंदोलन केले.

मात्र कर्जमाफीबाबत खुद्द शेतकर्‍यांच्या मनात काय भावना आहे याचा जिल्ह्यातून आढावा घेतला असता शेतकर्‍यांच्या मते सर्वांना सरसकट कर्जमाफी देण्यापेक्षा थकबाकीदार किती प्रमाणात आहेत, नियमित कर्जपरतफेड करणारे शेतकरी किती आहेत त्याचबरोबर प्रत्यक्ष आर्थिक अडचणीत किती शेतकरी आहेत याची वर्गवारी करून आणि थकबाकीची रक्कम लक्षात घेऊन त्या प्रमाणात शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी. तसेच जे शेतकरी उत्पन्न होऊनही बँकांना कर्ज हप्ते भरत नाहीत अशा शेतकर्‍यांना किमान तीन वर्षे तरी सहकारी बँकांनी कर्ज घेण्यास अपात्र ठरावावे, असा सूरही शेतकर्‍यांमध्ये उमटत आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वसुलीत अत्यल्प भर पडलेली असल्याने थकबाकीचे प्रमाण सुमारे ९० टक्क्यांच्या आसपास आहे. जिल्हा बँकेचा एनपीए ३५ टक्क्यांच्या जवळपास पोहोचला आहे. खालावलेल्या पतमुळे जिल्हा बँकेला नाबार्ड आणि शिखर बँकही आर्थिक सहाय्य करण्यास तत्पर नाही.
शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी ही मागणी सर्वच पक्षांनी लावून धरल्याकडे लक्ष वेधताना शेतकर्‍यांचे म्हणणे आहे, शेतकर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय शिकार करण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात. मात्र यामुळे काही साध्य होत नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी विनोद जाधव यांनी दिली. तर शेतकर्‍यांसाठी अर्थवाहिनी असणार्‍या सहकारी बँका, सोसायटी यांच्याकडे थकबाकी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे वेळोवेळी कर्जमाफीची उठलेली आवई.

त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊन थकबाकी भरावी की कर्जमाफीची वाट पाहावी, अशी अवस्था असल्याने शेतकर्‍यांनी पैसे भरण्यास आखडता हात घेतला, असे मत त्र्यंबक गायधनी यांनी व्यक्त केले. सचिन बोराडे यांनी कर्जमाफीबाबत सद्यस्थितीवर भाष्य करताना सांगितले, कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍यांना राष्ट्रीयकृत बँकांकडून पैसे मिळणे दुरापस्त झाले आहे. सहकारी बँकांची अवस्थाही बिकट झालेली आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांचे हित साध्य होईल असे कृषी धोरण राबवून कायमस्वरुपी तोडगा काढणे अपेक्षित आहे.
उत्पन्न खर्च आणि मिळणारा परतावा याचा हिशेब केला तर शेतकरी कायम तोट्यात आहे. शासनाने शेतकर्‍यांना हमीभाव द्यावा. त्यामुळे

LEAVE A REPLY

*