शिवसेनेच्या केंद्रस्थानी शेतकरी – ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे

0
नाशिक : शिवसेनेच्या कृषी अधिवेशनाला नाशिकमधील चोपडा लोन्स येथे सकाळी दहा वाजेपासून सुरुवात झाली आहे. दीप्रज्वलन झाल्यांनतर ग्रामविकास राज्यमंत्री आणि मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांनी प्रास्ताविक केले यात त्यांनी सांगितले की, शिवसेनेच्या केंद्रस्थानी शेतकरीच असून शेतकरयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न सुटण्यासाठी कर्जमुक्तीचाच पर्याय असल्याचे दादा भूसे यांनी सांगितले. उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही कर्जमाफीची गरज असल्याचे ते म्हणाले.

सकाळी सुभाष देसाई,  डॉ दीपक सावंत, दादा भुसे यांच्यासह अन्य मंत्र्यांचे अधिवेशनस्थळी आगमन झालेले आहे. कृषी अधिवेशनात 1 जून पासून संपावर जाणार अशा टोप्या घातलेल्या शेतकऱ्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. अधिवेशनाला शेतकऱ्यांची लक्षणीय गर्दी  आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचेही बारा वाजेच्या सुमारास कृषी अधिवेशनस्थळी आगमन झाले. तेसायंकाळी चार च्या सुमारास शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत.

 

 

LEAVE A REPLY

*