Video : शेतकऱ्यांसाठी शिवसेनेकडून बँकांसमोर ‘ढोल बजाव’ आंदोलन

0
मनमाड /नाशिक | शासनाने शेतकऱ्यांची कर्ज माफी केली मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राज्यातील बहुतेक ठिकाणी आज शिवसेनेकडून ढोल बजाव आंदोलन करण्यात आले.

नाशिक, मनमाडमध्ये सकाळी बँकांच्या शाखेबाहेर ढोल वाजवून हे आंदोलन करण्यात आले. शिवसेनेचे अनेक पदाधिकारी या आंदोलनात असंख्य कार्यकर्त्यांसोबत या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेने हे आंदोलन केल्यामुळे भारतीय जनता पक्षाची पुन्हा एकदा कोंडी करण्याचा प्रयत्न झालेला आहे.

LEAVE A REPLY

*