जिल्ह्यातील दोन लाख शेतकर्‍यांना कर्जवाटप

0

जिल्हा बँकेची माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 1 लाख 92 हजार शेतकर्‍यांना पीक कर्ज वितरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेने दिली. खरीपसाठी पीक कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांमध्ये 476 शेतकरी नविन सभासद आहेत. त्यांनी 2 कोटी 17 लाख रुपये कर्ज घेतलेले आहे.
गतवर्षी एकूण सुमारे 2 लाख 78 हजार शेतकर्‍यांनी खरीप हंगामासाठी 1 हजार 717 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.यंदा बहुतेक थकबाकीदारांनी कर्जमाफी निर्णयामुळे कर्ज न भरल्याने पुन्हा घेण्याचा प्रश्‍नच येत नाही.त्यामुळे कर्जमाफीमुळे चालू वर्षी कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या रोडावली आहे.
त्यामुळे जिल्हा बँकेला कर्ज वसुली करण्यासाठी अडचणी येत आहेत. सध्या कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांची संख्या कमी असली तरी, पात्र सभासद शेतकर्‍यांना बँकेकडून कर्ज वाटप सुरू आहे. तर, थकबाकीदार शेतकर्‍यांची कर्जमाफीबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे.
30 जून 2016 पूर्वीच्या थकबाकीदार शेतकर्‍यांची कर्जमाफी झाल्यास 30 जून 2017 पर्यत थकबाकीदार शेतकर्‍यांच काय? असा प्रश्‍न सध्या त्या शेतकर्‍यांकडून उपस्थित होत आहे.

 

LEAVE A REPLY

*