तीन लाख शेतकर्‍यांचा खरीप पीक विमा रखडला

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- कृषी विभागामार्फत गेल्यावर्षी राबवण्यात आलेल्या खरीप पीक विमा योजनेत 3 लाख 79 हजार 301 शेतकर्‍यांनी सहभाग नोंदवला होता. यापैकी तब्बल 3 लाख 13 हजार 486 शेतकरी अद्याप विमा रक्कमेच्या प्रतीक्षेत आहेत. कृषी विभागाने वारंवार विमा कंपन्यांशी संपर्क केलेला असला तरी काही उपयोग झालेला नाही.

चालू वर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र, गेल्यावर्षीची भरपाई न मिळाल्याने शेतकरी संतप्त आहेत. चालू वर्षात शेतकरी विमा योजनेत सहभागी होतील की नाही? हा प्रश्‍न आहे. गेल्यावर्षी विमा योजना राबवण्यासाठी एचडीएफसी विमा कंपनीची निवड करण्यात आली.या कंपनीकडे मागील बाकी असताना यंदा नगर जिल्ह्यासाठी पुन्हा दुसर्‍या कंपनीची निवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षीचाच विम्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळालेला नसल्याने शेतकर्‍यांमध्ये संभ्रम अवस्था आहे.

गतवर्षातील खरीपाची रक्कम शेतकर्‍यांच्या पदरात पडलेली नसल्याने विमा कंपन्याच्या विरोधात शेतकर्‍यांच्या मनात तीव्र रोष आहे. पिकांचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीने पिकाचे नुकसान झाल्यावर वैयक्तिक पंचनामे करण्यासाठी कंपनीचे प्रतिनिधी शेतकर्‍यांवर विश्‍वास न ठेवता थेट शेतात येवून पाहणी करुन गेले. मात्र, त्यांचा मोबदला अद्याप नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना न मिळाल्याने संबधित कंपनीवरील शेतकर्‍यांचा विश्‍वास उडाला आहे. त्यात सरकारने यंदाच्या खरीपातील पीक विमा राबविण्याचे धोरण निश्‍चित करतांना नव्याने विमा कंपनी दिल्याने शेतकर्‍यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

गेल्यावर्षीचा प्रमाणेच यंदाच्या नवीन कंपनी पुनर्रावृत्तीतर होणार नाही अशी भीती शेतकर्‍यांमध्ये आहे. सरकारकडून विमा करण्याची नियुक्त करण्यात येते. कृषी विभाग केवळ सरकारच्या आदेशानूसार विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी काम करते. मात्र, शेतकर्‍यांना विमा न मिळ्यास बदनामी मात्र कृषी विभागाची होते.

यंदा नवीन कंपनी – 
चालू खरीप हंगामासाठी शासनाने जिल्ह्यासाठी दि युनायटेड इंडिया इंन्शुरन्स ही नवीन कंपनी नियुक्ती केली आहे. नगरसह बीड, नाशिक, पुणे, रत्नागिरी या जिल्ह्यासाठी हीच कंपनी काम करणार आहे.

LEAVE A REPLY

*