शेती औजारासाठी शेतकर्‍यांची प्राधान्य यादी तयार

0

14 हजार अर्ज : उपलब्ध निधीनुसार मिळणार खरेदीसाठी पूर्वसमंती

अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्नत शेती- समृध्द शेतकरी मोहिमेतर्ंगत यंदा विविध शेती औजारे खरेदीसाठी देण्यात येणार्‍या अनुदानासाठी जिल्ह्यातील 14 हजार 368 शेतकर्‍यांचे अर्ज कृषी विभागाला प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जातून शेतकर्‍यांची ज्येष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर उपलब्ध होणार्‍या निधीतून औजार खरेदीसाठी संमती देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

यांत्रिककिरण 2017-18 अंतर्गत कृषी अधीक्षक कार्यालयाला जिल्ह्यातून 14 हजार 338 अर्ज प्राप्त झाले होते. लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यामुळे संबधित लाभार्थीयांची निवड सोडत पध्दतीने करण्यात आली. टॅक्टर व टॅक्टर चलील औजारे मिळण्यासाठी सोडतीव्दारे स्वतंत्र जेष्ठता क्रमवारी निश्‍चित करण्यासाठी 21 ते 24 जून दरम्यान तालुकानिहाय संबधित अर्जदार शेतकरी व कृषी विभागाच्या अधिकार्‍यासमक्ष ड्रॉ काढण्यात आला.

ड्रॉ काढून तयार करण्यात आलेली यादी पाहण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्राप्त भौतिक आर्थिक लक्षांकानुसार सोडत पध्दतीने निवड करण्यात आलेल्या पात्र लाभार्थी शेतकर्‍यांची प्राधान्यक्रमाने तयार करण्यात आलेल्या यादीनुसार शेतकर्‍यांना निवड केल्याचे पत्र मिळणार आहे.निवड झालेल्या संबधित शेतकर्‍यांनी 10 दिवसात पुर्तता करुन सदर प्रस्ताव तालुका कृषी अधिकार्‍यांना सादर करणे बंधनकारक आहे.

प्रस्तावाची पडताळणी करुन पात्र शेतकर्‍यांच्या वर्गवारीप्रमाणे प्राप्त अनुदानाचे अधिन राहुन क्रमवारीनूसार शेतकर्‍यांना यंत्र खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात येणार आहे.त्यानंतर 30 दिवसात संबधित यंत्र खरेदी करुन अनुदानासाठी प्रस्ताव सादर करणे बंधनकार आहे. आठ दिवसात जिल्हास्तरावर अनुदान प्राप्त होण्याची शक्यता आहे.अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक पंडीत लोणारे यांनी दिली.

ट्रॅक्टरसाठी 6 हजार 913 अर्ज
ट्रॅक्टरसह ट्रॅक्टरचलीत औजारासांठी प्राप्त 14 हजार 368 अर्जामध्ये तब्बल 6 हजार 913 अर्ज आहे. यामधील अर्जदार सर्व शेतकर्‍यांची संवर्गनिहाय निवड करण्यात आली आहे. एकूण निधीच्या 40 टक्के अनुदान हे ट्रॅक्टरसाठी खर्च करण्यात येणार आहे.

यंत्र निहाय प्राप्त अर्ज
एकूण यंत्र निहाय प्राप्त व प्राधान्यक्रमानुसार निवडलेल्या अर्जाची संख्या अशी- पावरटिलर 841 , रोटावेटर 2559 ,नांगर 284 , पेरणी यंत्र 657, कल्टीव्हेटर 343, मळणीयंत्र 714 , दाळमील 1024, फवारणी यंत्र 534, मिनी भात मिल 14, भात लावणी यंत्र 6, ऊस पाचट कुट्टी 13, कापूस पर्हाटी 9, औजारे बँक 1, मिस्ट ब्लोअर 1, पॉवर विडर 2 व रिपर, रिपर कम बाईडर प्रत्येकी 3 तसेच इतर 447 अशी एकूण 14 हजार 368 अर्ज प्राप्त.

तालुकानिहाय संख्या
तालुकानिहाय (सर्व बाब मिळून एकूण अर्ज)- अकोले-632, पारनेर-866, कर्जत-1375, श्रीरामपूर-690, शेवगाव-791, श्रीगोंदा-1516, राहाता-966, कोपरगांव-960, नगर-1228, पाथर्डी-889, संगमनेर-1272, राहुरी-890, जामखेड-480, नेवासा-1813 एकूण 14 हजार 368 आहेत.यामध्ये अनुसूचित जाती-जमाती, महिला व सर्वसाधारण अशी संवर्गनिहाय लाभार्थी निवड करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*