पुर्नगठनामुळे 40 हजार शेतकरी वंचित

0

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांची माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकरी ज्यावेळी दुष्काळाच्या खाईत लोटला गेला.त्यावेळी त्यांच्या डोक्यावर असलेले कर्जाचे पुर्नगठण करावे.असा निर्णय याच सरकाने घेतला.मग, आता शासन निर्णयामध्ये घातलेल्या जाचक अटीमुळे जिल्ह्यातील 4 हजार शेतकरी वंचित राहणार असल्याचे शासननिर्णयावरुन स्प होत असल्याची माहिती रा्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी दिली.

शुक्रवार 8 रोजी रा्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या उपस्थित होणार्‍या मेळाव्याची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान 14 तालुक्याचा दौरा करुन संबधित कार्यकर्त्याच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. यावेळी सरकारने केलेली कर्ज माङ्गी ङ्गसवी असल्याचे जाणवले.लोकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे घुले यांनी सांगितले.

राज्य सरकारने शेतकर्‍यांना दुष्काळ काळात 50 पैसे पेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावातील शेतकर्‍यांच्या कजाचे पुर्नगठन करण्याचे आदेश दिले होते. त्या नूसार जिल्हा बँकेने पुर्नगठण केले. त्या कर्जाची परतङ्गेड करण्याची मूदत 30 जून 2017 आहे. मात्र, शासनाने ू28 जून शासननिर्णय प्रसिध्द करुन संबधित शेतकर्‍यांनी मागिल थकबाकी भरली असेल.

तर, त्यांना त्याचा लाभ होईल.मात्र, दोन दिवस शिल्लक असतानाही शेतकर्‍यांनी रक्कम न भरल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा पाठपुरावा सुरु केला.सरकारने त्याची मूदत आता 30 जुलै पर्यत केली आहे. मात्र, जिल्ह्यातील 40 हजार शेतकर्‍यांना त्यामिळणार नसून 280 कोटी रुपयांच्या कर्जमाङ्गीपासून शेतकर्‍यांना दूर राहावे लागणार आहे. त्यामूळे सभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. सदर निर्णया विरोधात न्यायालयात जायचे की नाही विचार विनिमय सुरु असल्याचे घुले यांनी सांगितले.

त्यासाठी राष्ट्रवादी सर्वात पुढे –
जनतेचे विविध प्रश्‍न व सरकारच्या चूकीच्या धोरणा विरोधात राष्ट्रवादी पक्ष नेहमी पुढे राहिला असल्याचे श्री. घुले यांनी स्प केले. 

विविध मेळाव्यांचे नियोजन –
शुक्रवार 7 रोजी पक्षाचा जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता जिल्हा मेळावा, दुपारी 2 वाजता युवक मेळावा व 4 वाजता महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आहे. दरम्यान रा्रवादी भवनात तालुकानिहाय आढावा बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*