Type to search

Featured सार्वमत

नैराश्यातून शेतकर्‍याची आत्महत्या

Share

छावण्या बंद अन् कर्जबाजारीपणाचे कारण

अहमदनगर (वार्ताहर) –  प्रशासनाने बंद केलेल्या छावण्या आणि कर्जबाजारीपणामुळे नगर तालुक्यातील खांडके येथील शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. लक्ष्मण संपत गाडे (वय-35) असे त्या शेतकर्‍याचे नाव आहे. कर्जबाजारीपणा व शासनाने छावणी बंद केल्यामुळे त्या शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थांकडून मुख्यमंत्र्यांना महाजनादेश यात्रेमध्ये काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा देण्यात आला आहेत.

खांडके येथे रास्ता रोको
गाडे यांच्या आत्महत्येनंतर प्रकरणी खांडके येथे संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले पंचायत समिती सभापती रामदास भोर, शरद झोडगे, संदीप गुंड, पोपट चेमटे यांसह ग्रामस्थ सहभागी झाले.

नगर तालुक्यात ही दुसरी घटना आहे. शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे. आत्महत्या करणारा शेतकरी गरीब व अपंग असून जगायचा मार्गच बंद झाल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. सरकार देतंय पण अधिकारी देत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रास्ता रोको करणे आमच्या मनात नव्हते; परंतु आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबाला काहीतरी आधार मिळाला पाहिजे. न्याय मिळाला पाहिजे म्हणून जनतेच्या भावना विचारात घेऊन 24 तारखेला मुख्यमंत्र्याना निवेदन देणार आहोत. तसेच शेतकर्‍यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीमागे खंबीर उभा उभे राहून न्याय मिळवून देणार आहोत.
– संदेश कार्ले, जि. प. सदस्य

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!