Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव : कापूस पाण्यात भिजल्याने वैफल्यग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या

Share

मालेगाव | प्रतिनिधी 

तालुक्यातील कोठरे येथील शेतकरी आत्महत्येची घटना ताजी असताना आज रोझे येथील वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. भास्कर रामा घुगे (वय ६६) या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घुगे यांनी कपाशी लावलेली होती, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पावसाच्या तडाख्यात कपाशी पिकासह इतर खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले.

पावसाळ्यातील पिकांवर रब्बीसह पुढील आर्थिक नियोजन अवलंबून होते. यंदा पावसाला चांगला झाल्याने पिकेही जोमदार होती, मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसाने उभ्या पिकांची नासाडी झाली आहे.कपाशी पूर्णपणे पाण्यात भिजली. मक्याच्या आणि बाजरीच्या शेतात शेतात कणसांना कोंबं फुटली,

पावसाळी कांदा जमीनदोस्त झाला तर भुईमुग अधिक पाणी झाल्यामुळे जमिनीतच सडला. अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेत जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच मालेगाव ग्रामीणचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. शासनदरबारी अहवाल पाठवून मदतनिधी उपलब्ध करून देण्याची आश्वासन यावेळी तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी दिले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यावर कुठल्या बँकेचे किती कर्ज होते याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

विशेष म्हणजे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे जिल्ह्यात नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्यावर असल्यामुळे २४ तासांत जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!