Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव : कोठरे शिवारात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

Share

मालेगाव | प्रतिनिधी

परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने नैराश्य आलेल्या अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन  अत्म्हत्याने केल्याची दुर्दैवी घटना घडली. मालेगाव तालुक्यातील कोठरे शिवारात आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. केदा मोठाभाऊ देवरे (वय 60) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर बँकेचे साडेतीन लाख आणि हातउसनवारीचे कर्ज होते.

अधिक माहिती अशी की, कोठरे शिवारात केदा देवरे यांची साडेतीन एकर शेती आहे. शेतात झोपडी करून ते पत्नी, मुलगा सून आणि नातवंडे यांच्यासह राहत होते.  सुरुवातील केदा देवरे यांनी शेतात दुष्काळ असताना डाळींबाच्या ५०० झाडांची लागवड केली होती. ऐन फुलोऱ्यावर आलेल्या बागेत अज्ञात करणारे फुलं गळून पडली. यामुळे डाळींबावर केलेला खर्च माथी पडला.

त्यानंतर यावर्षी पावसाळा चांगला असल्याने त्यांनी शेतात पावसाळी कांद्याची लागवड केली होती. कांदे काढून त्यांचे डोक्यावरचे कर्ज फेडण्याचे नियोजन होते. मात्र, अचानक मालेगाव तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. यामध्ये देवरे यांचा संपूर्ण कांदा भिजून सडला.

शेतीच्या भांडवलासाठी देवरे यांनी तालुक्यातील वडनेर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून साडेतीन लाखांचे कर्ज घेतले आहे. तसेच पत्नी आणि सुनेचे दागदागिने तारण ठेऊन काही भांडवल जमवले होते.

मात्र पावसाच्या हाहाकाराने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने देवरे गेल्या दोन-तीन दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. आज सकाळी ते प्रातविधीसाठी घराबाहेर पडल्यानंतर ते बराच वेळ झाला तरी घरी परतले नाहीत.

त्यांची पत्नी आणि मुलाने त्यांचा शोध घेतला. परिसरातील शेतकऱ्यांना याबाबत कल्पना दिली. त्यांनीही शोधकार्य सुरु केले असता स्वतःच्या विहिरीच्या नजीक त्यांची चप्पल आढळून आली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दिवाळी उलटून दोन दिवसांतच अशी घटना घडल्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

पावसाळा चांगला होऊनदेखील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!