श्रीरामपूर : मुठेवडगावमध्ये तरूण शेतकर्‍याची आत्महत्या

0
माळवाडगाव (वार्ताहर) – वडिलांच्या नावावर कर्ज असल्याने आणि नवीन कर्ज मिळत नसल्याने नैराश्य आलेल्या तरूण शेतकर्‍याने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवडगाव येथे घडली.
योगेश निळकंठ मुठे (वय 27) असे मयत तरूणाचे नाव आहे.

वडिलांच्या नावावर कर्ज असल्याने पुन्हा कर्ज मिळत नव्हते. तसेच कृषि पंपाचे बील, शेतीतील मजुरांचे पैसे कसे द्यायचे या चिंतेत तो होता. मुठे यांच्या शेततात ऊस लागवड सुरू होती. मात्र, जवळ पैसे नसल्याने आणि मजूरांअभावी ऊस लागवड अर्धवट अवस्थेत राहीली. त्यामुळे नैराश्य आलेल्या योगेश मुठे याने आपल्या शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्याचे वडिल देखील अजारी आहेत. त्याच्या पश्‍चात वडिल, आई, दोन बहिणी असा परिवार आहे.

 

LEAVE A REPLY

*