सरकारला सद्‌बुद्धी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा महादेवाला दुग्धाभिषेक

0

डुबेरे : कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, उत्पादित मालाला हमीभाव दयावा, समृद्धी महामार्ग रद्द करावा यासह अन्य मागण्यासाठी बळीराजाने राज्यभर आजपासून बंद पुकारला आहे.

केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आणली आहे. सरकारला शेतकऱ्यांची व्यथा समजत नाही. सरकारला सदबुद्धी यावी यासाठी डुबेरेकरांनी महादेवाला दुग्धभिषेक घालून सरकार विरोधात घोषणा दिल्या.

यावेळी उपसरपंच अनिल वारुंगसे, सदस्य प्रवीण वारुंगसे, ऍड. प्रदिप वारुंगसे, पोपट वामने, रामदास कुंदे, संजय वाजे, अशोक वाजे, रमेश कुरणे, योगेश वारुंगसे, विजय वारुंगसे, रामदास वारुंगसे, गोरख ढोली, सचिन वाजे, अमोल वारुंगसे, निलेश वारुंगसे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*