शेतकरी संप हे तत्कालिन सरकारचेच पाप – अर्थमंत्री मुनगंटीवारांचा आरोप

0
नाशिक : शेतकरी संपबाबत सरकार संवेदनशील आहे. शेतकरी संपावर जाउच नव्हे म्हणून आम्ही गेल्या अडीच वर्षांपासून विविध उपक्रमातून आम्ही प्रयत्न करत आहोत.

सिंचनाक्षेत्रासाठी 7271 कोटींचा निधी दिला. मागील सरकारने वीज कनेक्शनसाठी जास्तीत जास्त 150 कोटी देत आमच्या सरकारने 1039 कोटी रूपये एकावर्षासाठी दिले. सावकाराच्या कर्जातुन मुक्ती देण्यासाठी कायदा केला.

पतपुरवठा करण्यासाठी कर्जाचे पुर्नगठन केलें. विपणन व्यवस्थेसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यामध्ये बदल , सावतामाळी बाजारपेठ योजना तसेच गोडाउन बांधण्यासाठी योजना आखत शेतमालाला संरक्षण देण्याच्या दृष्टीने पावले उचलली.

शेतमालावर प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी योजना तयार करता आहोत याकरीता क्लस्टर तयार करत आहोत.
अजूनही या क्षेत्रात खुप काम करायचे आहे. अडीच वर्षात सर्व प्रश्न सुटू शकणार नाही. मागे 15 वर्षात जे चुकिचे नियोजन झाले त्यामूळे शेतकरयाला संपावर जाण्याची वेळ आली आहे. त्यामूळे शेतकरयांचा संप हा तत्कालिन सरकारचे पाप असल्याचा आरोप अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

LEAVE A REPLY

*