हमीभावासाठी शेतकर्‍यांचा मोर्चा

0
शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिव्हाळा फाउंंडेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड व तालुक्यातील शेतकर्‍यांच्यावतीने खर्डा चौकातून सोमवारी मोर्चा काढण्यात आला.

जामखेड (तालुका प्रतिनिधी)- शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी सरकारने कायदा केला आहे. तो प्रत्यक्षात अस्तित्वात नाही, त्यामुळे सरकारची ही फसवी घोषणा आहे. शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवरच गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केली. हे तुघलकी सरकार शेतकरी विरोधी असल्याने आता यांना घालविण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे सांगितले. शासनाच्यावतीने शेतीमाल हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी जिव्हाळा फाउंडेशन, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड व तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने खर्डा चौकातून सोमवार 3 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता मोर्चा काढण्यात आला.

या आंदोलनात जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार, प्रा मधुकर राळेभात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, ऋषिकेश डुचे, लक्ष्मण कानडे, शहाजी डोके, अवधूत पवार, रमेश आजबे, शेरखान पठाण, भानुदास बोराटे, दत्तात्रय विष्णू वारे, नामदेव राळेभात, सिध्दार्थ घायतडक, गुलाब जांभळे, चंद्रकांत साळुंके, गणेश हगवणे, डॉ. कैलास हजारे, भीमराव पाटील, अमित जाधव, कुंडल राळेभात हरिभाऊ खवळे, जयसिंग उगले, राजू वारे, अमोल गिरमे, संभाजी ढोले, हभप लक्ष्मण, औसरे महाराज, शिवाजी सातव, तात्या मुरुमकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हमीभाव केंद्रच सुरू करण्यात आले नसल्यामुळे कवडीमोल दराने मालाची विक्री शेतकर्‍यांना करावी लागणार आहे.शासनाने हमीभाव केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्यापही शासकीय हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले नाहीत. याचा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे.त्यामुळे शासकीय खरेदी हमीभाव केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

तसेच शेतकरी पीक पिकत नाही म्हणून आत्महत्या करत होता. आता पिकलेले पीक विकत नाही त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. याला शासन जबाबदार आहे. हमीभाव केंद्र तालुक्यात मंडलनिहाय सुरू करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या. यावर तहसीलदार विशाल नाईकवडे यांनी लेखी पत्र मोर्चेकर्‍यांना दिले. सुमारे पाच तासांनंतर हा मोर्चा संपला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शेतकरी सहभागी झाले होतेे.

LEAVE A REPLY

*