शेतकरी महासंघाच्या राज्य कार्यकारणी बैठकीत विविध विषयांवर चर्चा

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय शेतकरी मराठा महासंघाची राज्यस्तरीय बैठक रविवारी नगरमध्ये झाली. यावेळी शेतकर्‍यांचा संप आणि त्यांच्या मागण्यावर व्यापक स्वरूपात चर्चा झाली. शेतकर्‍यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष झाल्यास मराठा स्टाईलने सरकारला जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरातील ओमगार्डन येथे पार पडलेल्या बैठकीला महासंघाचे सचिव दिलीप जगताप समवेत प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, शहराध्यक्ष बाळासाहेब पवार, रमेश बोरुडे, शिवाजी डौले, सयराम बानकर, मनोहर वाडेकर, अनिल सोनवणे, अमितकुमार टाकळकर, संतोष पाटील, दिलीप पाटील, ज्ञानदेव फसले, सुनिल नानवटे, परशुराम कासुळे, नाना डोंगरे, शुभम भोसले, वैभव ठाणगे आदिसह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकर्‍यांचा संपूर्ण सातबारा कोरा करण्यासह, स्वीमीनाथन आयोग लागू करावा, शेतकर्‍यांच्या मालाला हभीभाव मिळावा, शेतकर्‍यांच्या मुलांना मोफत वसतिगृह, 60 वर्षावरील शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्यासंर्भात बैठकीत चर्चा झाली.
यासह राज्य सरकारने राष्ट्रवादीचे नेते शरद पवारा यांच्या बदनामीचे षडयंत्र थांबवावे, मराठा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र उभा केला असून सत्ताधारी मराठ्यांना दाबण्यासाठी चाणक्यनितीचा वापर करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शेतकरी आंदोलनाबाबत शिवसेनेची भुमिका मान्य नसल्याने, कर्ज माफीवरुन शिवसेनेने सत्तेमधून बाहेर पडावे. राष्ट्रवादीने जर भाजपला पाठिंबा दिल्यास शेतकरी त्यांना निवडणूकीत धडा शिकवेल, आदी मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

 

 

LEAVE A REPLY

*