परतफेड करणार्‍यांना कर्ज न दिल्यास गुन्हा

जिल्हा प्रशासनाचा जिल्हा बँकेला इशारा

0
नाशिक | दि. २३ प्रतिनिधी-   कर्जफेड करतानाच शेतकर्‍याने पुन्हा तेवढेच कर्ज मागितले तर आवश्यक कार्यवाही पुर्ण करून त्याला लगेचच कर्ज उपलब्ध करून द्या अशा सूचना जिल्हा बँकेला करण्यात आल्या आहेत. बँकेने आदेशाचा भंग केल्यास गुन्हे दाखल केले जातील असा इशाराही जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे.

पीककर्ज वसुली न झाल्याने जिल्हा बँक सध्या आर्थिक कोंडीत सापडली आहे. मात्र ज्यांनी नियमित कर्ज परतफेड केली त्यांनाही कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही अशी सद्यस्थिती आहे. जिल्हा बँकेने एकूण वाटप केलेल्या २७९४ कोटींच्या कर्जापैकी २५३४ कोटींचे पिककर्ज वाटप केले आहे.

त्यापोटी अवघे १५७ कोटी म्हणजेच ५.६० टक्के कर्ज वसुल झाले आहे. कर्जमाफीच्या शक्यतेने अनेक कर्जदारांनी कर्ज परतफेड केली नसल्याचे समोर आले आहे. कर्ज उपलब्ध होत नसल्याने शेतकर्‍यांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत. या सर्व पार्श्वभुमीवर जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी पिककर्जाबाबत आढावा घेतला.

या आढावा बैठकीला प्रशासकीय अधिकार्‍यांसह बँकांचे अधिकारीही उपस्थित होते. कर्जाची परतफेड करणे शक्य असूनही अनेक शेतकरी परतफेड करीत नाहीत. पुन्हा कर्ज मिळेल याची शाश्वती शेतकर्‍यांना नसल्याने शेतकरी कर्जपरतफेड करत नसल्याची बाब या बेैठकित चर्चिली गेली.

त्यामूळे जिल्ह्यात केवळ २२ हजार ६५४ शेतकर्‍यांनी कर्ज परत केले असून २ लाख १७ हजार ६३० शेतकर्‍यांनी अजूनही कर्जाची परतफेड केलेली नाही. म्हणूनच कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍याने पुन्हा नवीन कर्जाची मागणी केल्यास ती तात्काळ पुर्ण करा अशी सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी जिल्हा बँकेला केली आहे.

अशा व्यवहारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांवर सोपविण्यात आली आहे. सदर आदेशाचे पालन न केल्यास जिल्हा बँकेवर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही जिल्हाधिकारयांनी दिला आहे.

अनेक शेतकरी कर्ज परतफेड करू शकतात. मात्र पुन्हा कर्ज मिळणार नाही या कारणास्तव हे शेतकरी पुढे येत नाही. मात्र यापूढे कर्ज परतफेड करणारयांनाच कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात जिल्हा बँकेला सुचना देण्यात आल्या आहेत. संबधिताने कर्जाची आवश्यकता नसल्याची हमी दिल्यास तो निधी इतरत्र वळविला जाईल. मात्र पहीले प्राधान्य परतफेड करणारया शेतकरयांना द्यावे लागेल. सुचनांचे पालन न केल्यास बँकेवर गुन्हा दाखल केला जाईल.
– राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी

LEAVE A REPLY

*