शेवगाव गोळीबार प्रकरण : घोटण ते मुंबई दिंडी आज निघणार

0

संभाजी दहातोंडे : तातडीने कारवाई व्हावी

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेवगाव तालुक्यात शेतकर्‍यांच्या उसाला भाव मिळावा, यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात पोलिसांनी शेतकर्‍यांवर गोळीबार केला. यात दोन शेतकरी जखमी झाले. या प्रकरणी बंदोबस्तासाठी असणारे पोलीस अधिकारी, गोळी झाडण्याचे आदेश दिलेले पोलीस अधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बुधवारी दुपारी 1 वाजता घोटण (ता. शेवगाव) ते मुंबई दिंडी निघणार असून गुरुवारी सकाळी 11 वाजता मुंबईत पोहोचणार असल्याची माहिती अखिल भारतीय शेतकरी महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोेंडे यांनी दिली.

शेवगाव तालुक्यातील घोटण व खानापूर या भागात शेतकरी आणि महिलांना पोलिसांनी घरात घुसून मारहाण केलेली आहे. पोलिसांचा हा प्रकार दडपशाहीचा असून पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारा आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या शेतकर्‍यांना सरकारने प्रत्येकी 10 लाख रुपये द्यावेत, गंगामाई शुगरने त्यांना कायम स्वरूपी नोकरीत समावून घ्यावे, आंदोलन हाताळणार्‍या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबन करण्यात यावे, हा प्रश्‍न प्रादेशिक सहसंचालक यांना हाताळता आलेला नाही. यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशा मागण्या दहातोंडे यांनी केल्या आहेत. यासाठीच घोटण ते मुंबई दिंडी काढण्यात येणार असून मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात येणार असल्याचे दहातोंडे यांनी सांगितले.

दरम्यान, शेवगाव गोळीबार प्रकरणी मुख्यमंंत्री फडणवीस यांनी चर्चोला बोलवले असून यावेळी शेतकर्‍यांची ऊसदर वाढीची मागणी लावून धरण्यात येणार असल्याची माहिती दहातोंडे यांनी दिली. 

LEAVE A REPLY

*