Type to search

पारनेरात कांदा झाकणार्‍या शेतकर्‍यावर वीज कोसळली

Featured सार्वमत

पारनेरात कांदा झाकणार्‍या शेतकर्‍यावर वीज कोसळली

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- रविवारी दुपारी पारनेर तालुक्यातील कोहकडी या गावात शेतात कांदा झाकण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यावर वीज कोसळून त्यात त्यांचा मृत्यू झाला. राहुल बाळासाहेब पवार असे मयत शेतकर्‍यांचे नाव आहे. जिल्हा प्रशासनाने यास दुजोरा दिला आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी रात्री असे अचानक वादळासह पावसाच्या सरींचा शिडकावा झाला. जोरदार वार्‍यामुळे अनेक ठिकाणी वीज गायब झाली होती. हवामान खात्याने नगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात रविवार (दि.14) आणि सोमवार (दि.15) जोरदार वार्‍यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

रविवारी दुपारी अशी परिस्थिती पारनेर तालुक्यात निर्माण झाली. यामुळे कोहकडी गावात राहणारे शेतकरी पवार हे शेतातील कांदा झाकण्यासाठी गेले होते. त्यावेळी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रविवारी दुपारपासून जिल्हाच्या विविध भागात विजांच्या गडगडाटासह पावसाने सरींनी लावली. दिवसाभराच्या असाह्य उष्णतेनंतर अचानक दुपारनंतर आभाळ भरून येत असून त्यातच जोरदार सोसायट्याचा वारा सुटत आहे. यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडूनप करण्यात येत आहे. आणखी दोन दिवस पावसाचा इशारा हवमान विभागाने दिला आहे.दरम्यान नगर तालुक्याच्या काही भागातही वादळाने दाणादाण उडाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!