Wednesday, April 24, 2024
Homeनगरकर्जमाफी : 1 हजार 24 कोटींचा निधी

कर्जमाफी : 1 हजार 24 कोटींचा निधी

अहमदनगर (प्रतिनिधी) – महाविकास आघाडी सरकारच्यावतीने देण्यात येणार्‍या कर्जमाफीत नगर जिल्ह्यात गुरुवारअखेर 1 हजार 24 कोटींचा निधी जिल्हा बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात आहे. हा निधी येत्या दोन दिवसांत बँकेच्या 1 लाख 76 हजार शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली. दरम्यान काल रात्रीपर्यंत जिल्ह्यात पात्र 2 लाख 15 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रामाणिकरण करण्यात आले आहे. यामुळे आता जिल्हा महाविकास आघाडीच्या कर्जमुक्तीने दिशेने निघाला आहे.

जिल्ह्यात महाविकास आघाडीच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीत 2 लाख 58 हजार शेतकरी पात्र आहेत. या शेतकर्‍यांना 2 हजार 296 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. यासाठी गेल्या आठ दिवसांपासून प्रक्रिया सुरू झाली आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांच्या कर्ज खात्याचे प्रमाणिकरण करण्यात येत आहे. प्रमाणिकरण पूर्ण झालेल्या खात्यांची नावे पुढे सरकत असून त्यानूसार बँकेच्या खात्यावर सरकारच्या आयटी विभागाकडून कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात सोमवारपासून जिल्हा बँकेच्या खात्यावर कर्जाची रक्कम वर्ग करण्यात येत आहे. यात सोमवारी 10 हजार 176 शेतकर्‍यांसाठी 69 कोटी रुपयांची कर्जाची रक्कम जमा करण्यात आली होती. तर मंगळवारी 75 हजार 403 शेतकर्‍यांसाठी 442 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. हा आकडा गुरूवारी 1 हजार 24 कोटीपर्यंत पोहचला असून 1 लाख 76 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. दुसरीकडे पात्र शेतकर्‍यांच्या आधार प्रामाणिकरणाची प्रक्रिया जोरात असून असून गुरूवारअखेर 2 लाख 15 हजार शेतकर्‍यांचे आधार प्रामाणिकरण झाले होते. येत्या दोन दिवसांत हे काम देखील पूर्ण होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या