कर्जमाफीच्या ऑनलाईन अर्जासाठी अडथळ्याची शर्यत

0

सर्व्हर डाऊन : पिकविमा, शैक्षणिक
दाखल्याच्या धावपळी ‘ऑनलाईन’ला खो

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची प्रभावी अंमलबजावणी आपले सरकार केंद्र, महाऑनलाईन आणि सीएसटी केंंद्र यांच्या मार्फत ऑनलाईन कर्जमाफीचे अर्ज भरण्यात येत आहेत. मात्र, हे अर्ज भरताना शेतकर्‍यांना एकनाअनेक अडथळ्यांना समोरे जावे लागत आहे.
सर्व्हर डाऊन, कन्टीव्हीटी मिळत नसल्याने अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावी लागत आहे. त्याच सध्या शैक्षणिक दाखल काढण्याचा कालावधी आणि पिक विमा उतरवण्याची धावपळ सुरू असल्याने त्याचा फटका ऑनलाईन कर्जमाफीचा अर्जा करण्याला बसतांना दिसत आहे. राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यानंतर कर्जमाफीत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने कर्जमाफीसाठी अर्ज करण्याचे आदेश दिले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अद्याप इंटरसेवा पोहचलेली नसताना त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा असा प्रश्‍न असतांना अन्य काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज भरण्यास परेशान असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.
गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन भरण्यासाठी तांत्रिक अडचणी आल्या असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मान्यही केले आहे. मात्र, पुढील आठवड्यात परिस्थिती सुधारणा होईल, अशी आशा जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी व्यक्त केली आहे. सध्या महा ई सेवा केंद्र, आपले सरकार आणि महाऑनलाईमध्ये विविध शैक्षणिक दाखले, पिक विमा या शुल्क आकारून सुविधा देण्यात येत आहे.
त्यात आता सरकारने शेतकर्‍यांचे कर्जमाफीचा ऑनलाईन निःशुल्क अर्ज दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहे. यामुळे हे केंद्रचालक आपल्या उत्पन्नावर पाणी सोडून सरकारचे फुकटचे काम कसे करणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याच अनेक ठिकाणी शेतकर्‍यांचे आधार कार्ड नोंदवताना दिलेला मोबाईल नंबर हा कर्जमाफीचा अर्जभरताना लिंक होत नाही. शेतकर्‍यांनी मोबाईल नंबर बदलेला असल्याने आता त्यांना बायोमेट्रीक करावी लागणार आहे.
मात्र, जिल्ह्यात अनेक केंद्रात बायोमेट्रीकचे मशिन उपलब्ध नसल्याने अडचणी वाढल्या आहे. पुढील आठवड्यात या मशिन उपलब्ध होणार असून 31 तारखेनंतर पिक विम्याचे काम संपणार आहे. त्यानंतर कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज भरण्यास वेग येणार आहे.

जिल्ह्यात शनिवार (दि. 29) अखेर आपले सरकार केंद्रामार्फत 2 हजार 865 अर्ज ऑफलाईन पध्दतीने, तर 450 ऑनलाईन अर्ज भरण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणार्‍या 843 बायोमेट्रीक मशिन सोमवारी (आज) बसवण्यात येणार आहेत. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील आपले सरकार केंद्रावर कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती आपले सरकार केंद्राचे व्यवस्थापक यांच्याकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

*