कर्जमाफीचे 475 कोटी रुपये जिल्हा बँकेच्या खात्यावर वर्ग

0

एक लाख 71 हजार शेतकर्‍यांना मिळणार लाभ

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्य सरकारने घोषणा केलेल्या शेतकरी कर्जातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची तिसरी ग्रीन लिस्ट बुधवारी जिल्हा बँकेला प्राप्त झाली आहे. यात 11 हजार 600 नियमित कर्जमाफीस पात्र असणारे शेतकरी आणि 78 हजार 240 प्रोत्सहान अनुदानास पात्र असणार्‍या शेतकर्‍यांची नावे आहेत.

राज्य सरकारच्या आयटी विभागाने आतापर्यंत कर्जमाफीस पात्र असणार्‍या शेतकर्‍यांच्या तीन ग्रीन लिस्ट जिल्हा बँकेला पाठविल्या आहेत. यात आधीच्या दोन ग्रीन लिस्टमध्ये 81 हजार 195 कर्जमाफीस पात्र असणार्‍या शेतकर्‍यांची नावे होती.

आता तिसर्‍या ग्रीन लिस्टमध्ये 11 हजार 600 शेतकर्‍यांचे दीड लाखांच्या आतील संपूर्ण तर 78 हजार 240 शेतकरी प्रोत्सहानपर योजनेस पात्र ठरली आहेत. तिसर्‍या ग्रीन लिस्टमध्ये कर्जमाफीची रक्कम 129 कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी 72 कोटी जिल्हा बँकेच्या खात्यावर जमा आहेत. तर उर्वरित रक्कम येणे बाकी असल्याचे सुत्रांनी सांगितले.

यापूर्वी जिल्हा बँकेच्या खात्यावर 403 कोटी रुपये सरकारने वर्ग केले असून त्यानंतर बुधवारी 72 कोटी आलेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी 475 कोटी रुपयांची रक्कम जिल्हा बँकेला मिळालेली आहे. आलेल्या ग्रीन लिस्टमधील कर्जमाफीस पात्र असणार्‍या शेतकर्‍यांची कर्जाची रक्कम आणि नावाची पडताळणी करून त्या त्या कर्ज खात्यावर कर्जाची रक्कम जमा करण्यात येत असल्याचे बँकेच्यावतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*