राष्ट्रीयीकृत बँकांच्या खात्यात दोन दिवसांत कर्जमाफीचा निधी

0

जिल्हा बँक : दुसर्‍या ग्रीन लिस्टमध्ये 51 हजार 538 शेतकर्‍यांची नावे

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा बँकेकडील दीड लाखाच्या आत कर्जमाफीस पात्र असणार्‍या शेतकर्‍यांची संख्या 81 हजार असून दुसर्‍या कर्जमाफीच्या ग्रीन लिस्टमध्ये 51 हजार 538 पात्र शेतकर्‍यांची नावे आली आहेत. या शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या रकमेपोटी 253 कोटींचा निधी जिल्हा बँकेला मिळाला आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये येत्या दोन दिवसांत राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्जमाफीस पात्र असणार्‍या शेतकर्‍यांची यादी आणि निधी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सोमवारी सायंकाळी उशिरा प्रभारी जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी, जिल्हा बँकेचे अधिकारी, जिल्हा डाटा सेंटर विभागाचे अधिकारी यांच्याकडून मुंबईहून सहकार खात्यातील, राज्य सरकारच्या आयटी विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी कॉन्फरन्सद्वारे जिल्ह्यातील कर्जमाफीची परिस्थिती जाणून घेतली. आतापर्यंत जिल्हा बँकेकडील कर्जमाफीस पात्र असणार्‍या शेतकर्‍यांची दोने ग्रीन लिस्ट पाठविण्यात आल्या आहेत. यातील नावांची आणि त्यांच्या कर्जाच्या रकमेची खात्री करून त्यानंतर संबंधित शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यातही रक्कम जमा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जिल्हा बँकेकडील कर्जमाफीस पात्र असणार्‍या 81 हजार शेतकर्‍यांपैकी 51 हजार 528 शेतकर्‍यांची यादी आणि त्यापोटी 253 कोटी रुपयांची रक्कम जिल्हा बँकेला प्राप्त झाली आहे. आलेल्या शेतकर्‍यांच्या नावाची, कर्ज प्रकाराची आणि कर्ज रकमेची पडताळणी करून संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसेच येत्या दोन दिवसांत राष्ट्रीयीकृत बँकेकडील कर्जास पात्र असणार्‍या शेतकर्‍यांची यादी पाठवण्यात येईल, अशी माहिती सहकार खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

*