दिवाळीपूर्वीच शेतकर्‍यांना कर्जमाफी

0

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा दावा

मुंबई – दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचा दावा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या उपसमितीची बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी हा दावा केला.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 56 लाख 59 हजार शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा बँकांकडील सुमारे 36 लाख कर्ज खात्यांची आणि व्यापारी बँकांकडील 30 लाख कर्ज खात्यांची माहिती ऑनलाईन माहिती (डेटा) व तंत्रज्ञान विभागाकडे सादर करण्याचे काम प्रगतिपथावर असून दिवाळीपूर्वी कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यास सुरुवात करावी अशी सूचना मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत संबंधितांना देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध झाल्यानंतर बँकांमार्फत शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यातील रकमा निरंक करून योजनेचा लाभ देण्यात येईल.

निवडणुका संपलेल्या गावांत चावडीवाचन –
अमंलबजावणीचा भाग म्हणून ज्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे, अशा गावांमध्ये चावडी वाचनाद्वारे आलेल्या सूचना आणि हरकती विचारात घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील निकषानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांची यादी ‘आपलं सरकार’पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*