कर्जमाफी यादीचे 849 गावांत चावडी वाचन

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील 1 हजार 310 गावांपैकी 849 गावात सोमवारी कर्जदार शेतकर्‍यांच्या नावांचे चावडी वाचन झाले.
या चावडी वाचनाव्दारे कर्जदार शेतकर्‍याच्या कर्ज खात्याची सत्यता पडताळण्यात आली. आता तालुकास्तरावर असणार्‍या तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत पात्र कर्जदार शेतकर्‍यांची यादी सरकारला कळवणार आहेत.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू असणार्‍या 205 गावात चावडी वाचन झाले नसून निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर 12 तारखेनंतर चावडी वाचन होणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
कर्जमाफीसाठी जिल्ह्यातून सर्वाधिक पाच लाख 11 हजार 868 शेतकर्‍यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. यापैकी काही शेतकर्‍यांच्या कुटुंबातील पत्नी, मुले व अन्य सदस्यांचेही स्वतंत्र रजिस्ट्रेशन झाले असल्याने ते सर्व एकत्रित केल्यानंतर कर्जमाफीसाठीच्या एकूण अर्जांची संख्या 2 लाख 61 हजार 511 झाली आहेत.
अर्जांची संख्या 2 लाख 61 हजार 511 झाली आहेत.जिल्ह्यातील गटसचिवांच्या माध्यमातून 1 ते 66 मुद्यांच्या अनुषंगाने कर्जदार शेतकर्‍यांची माहिती स्वतंत्रपणे संकलित करण्यात आली. जिल्ह्यातील 1 हजार 379 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांद्वारे कर्जवितरण झालेल्या 2 लाख 61 हजार 511 शेतकर्‍यांची अशी एक ते 66 मुद्यांची माहिती गटसचिवांनी संकलित केली असून, तिचे प्रमाणिकरण ऑडिटरद्वारे करण्यात येत  आहे.
जिल्ह्यात 1 हजार 310 गावे असून यातून 205 गावात ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. उर्वरित गावापैकी 849 गावात चावडी वाचन झाले असून 121 गावात पुढील दोन गावात चावडी वाचन होणार आहे.दरम्यान, कर्जमाफीसाठी ऑनलाईनसाठी दाखल अर्जाच्या याद्या डाऊनलोड करून त्यांचे गावनिहाय चावडी वाचन करण्यात येत आहे.
चावडी वाचनातून कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जाचा प्रकार, संबंधीत कर्ज दीड लाखांच्या आत आहे की बाहेर आहे याची माहिती जाहीरपणे सांगण्यात येत आहे. या याद्यामध्ये कर्जदार शेतकर्‍यांचे नाव आलेले नसल्यास संबंधीला त्या विरोधात अपिलही करता येणार आहे.
  तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर समिती असून चावडी वाचनाच्या वेळी संबंधीत गावातील तलाठी, ग्रामसेवक, सोसायटीचा गट सचिव, कृषी साहय्यक, सहकार खात्याचा प्रतिनिधी, जिल्हा बँकेचा प्रतिनिधी उपस्थित होते.
तालुकास्तरीय समितीने कर्जमाफीच्या यादीत अपात्र ठरवलेल्या अथवा यादीत नाव न आलेल्या शेतकर्‍यांना प्रांताधिकारी यांच्याकडे अपिल करता येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*