कर्जमाफी : पात्र शेतकर्‍यांची यादी पोर्टलवर

0

4 लाख 85 हजार 416 शेतकर्‍यांची कर्जमाफीसाठी ऑनलाईन नोंदणी 

अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफी व कर्ज सवलत योजनेत पात्र शेतकर्‍यांनी आपले आपले सरकार पोर्टलवर अर्ज भरलेले आहेत. या अर्जाची माहिती सोमवार (आजपासून) आपले सरकार संकेतस्थळावर प्रसिध्द झाली आहे. कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या शेतकर्‍यांनी या संकेतस्थळावरील यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी केले आहे.
दरम्यान, माहिती संचालक यांच्याकडील माहितीनुसार 10 सप्टेंबरअखेर जिल्ह्यातून 4 ला 85 हजार 416 शेतकर्‍यांनी ऑनलाईन कर्जमाफीसाठी नोंदणी केली असून यातील 2 लाख 33 हजार 863 शेतकर्‍यांनी ऑनलाईन अर्ज अपलोड केला आहे. हे ऑनलाईन अर्ज भरतांना काही अडचणी येत असून यात आधार नंबरशी मोबाईल लिंक नसल्याने अर्ज करतांना अडचणी येत आहेेत.
जिल्ह्यातील काही विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व 11 व्यापारी बँकांच्या शाा आपले सरकार पार्टलवर दिसत नसल्याने त्या संस्था आणि बँकांच्या कर्जदार  शेतकर्‍यांची माहिती भरत येत नाही. वारंवार सर्व्हर डाऊन असल्याने ऑनलाईन कर्ज भरण्यास जादा कालावधी लागत आहे. 70 वर्षावरील वयस्कर शेतकर्‍यांचे बोटाचे ठसे बायोमेट्रीक मशिनवर डिटेक्ट होत नसल्याने अर्ज भरण्यासत अडचणी येत आहेत.
कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी
जिल्हा बँक
दीड लाखांच्या आतील कर्ज 94 हजार 745 शेतकरी, 466 कोटी 79 लाख कर्जाची रक्कम
दीड लाखांवरील कर्ज 8 हजार 213 शेतकरी, 132 कोटी 52 लाख कर्जाची रक्कम
30 जून 2016 अखेरचे थकबाकीदार शेतकरी 1 लाख 2 हजार 958 आणि 599 कोटी 31 लाख कर्जाची रक्कम.
व्यापारी बँका
दीड लाखांच्या आतील कर्ज 54 हजार 949 शेतकरी, 393 कोटी 41 लाख कर्जाची रक्कम
दीड लाखांवरील कर्ज 35 हजार 103 शेतकरी, 998 कोटी 2 लाख कर्जाची रक्कम
30 जून 2016 अखेरचे थकबाकीदार शेतकरी 93 हजार 52 आणि 1 हजार 391 कोटी 43 लाख कर्जाची रक्कम.
पिककर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या कर्जदारांची
30 जून 2016 अखेरची माहिती
जिल्हा बँक 94 हजार 745 शेतकरी आणि 466 कोटी रक्कम
व्यापारी बँका 57 हजार 941 शेतकरी आणि 393 कोटी रक्कम
एप्रिल 2009 ला आणि त्यानंतर पिककर्ज, मध्यम मुदत कर्ज घेतलेले शेतकरी
जिल्हा बँक 8 हजार 213 शेतकरी आणि कर्ज 132 कोटी.
व्यापारी बँका 35 हजार 103 शेतकरी आणि 998 कोटी कर्ज.
25 हजार रुपयांचा लाभ मिळू शकणारे कर्जाचे पुर्नगठण केलेले शेतकरी
जिल्हा बँक 40 हजार 183 आणि रक्कम 55 कोटी आणि व्यापारी बँका 15 हजार 682 शेतकरी आणि 47 लाख रुपये रक्कम.
एकूण कर्जमाफीची संभाव्य रक्कम
जिल्हा बँक 4 लाख 13 हजार 270 शेतकर्‍यांना 1084 कोटी 45 लाख रुपये.
व्यापारी बँका 1 लाख 55 हजार 598 शेतकर्‍यांना 1555 कोटी 64 लाख रुपये.

पुन्हा करता येऊ शकतो अर्ज
कर्जमाफी व कर्ज सवलत योजनेत पात्र शेतकर्‍यांनी आपले आपले सरकार पोर्टलवर अर्ज भरलेले आहेत. या अर्जाची माहिती आपले सरकार संकेतस्थळावर असून त्यात नावे नसतीलतर अशांना पुन्हा अर्ज करावे लागणार आहेत. 

यांना मिळू शकतो लाभ
2015-16 मध्ये परत कर्जाची नियमित कर्ज फेडकेलेले शेतकरी जिल्हा बँक जून 2016 ला परतफेड केलेले शेतकरी 2 लाख 70 हजार 129 आणि रक्कम 1599. 88 कोटी, 31 मार्च 2017 पर्यंत 1 लाख 81 हजार 698 शेतकरी आणि रक्कम 956 कोटी आणि संभाव्य कर्जमाफीचा फायदा 2 लाख 70 हजार शेतकर्‍यांना 430 कोटी रुपये मिळू शकतो.


व्यापारी बँक जून 2016 ला परतफेड केलेले शेतकरी 46 हजार 864 आणि रक्कम 997 कोटी, 31 मार्च 2017 पर्यंत 26 हजार 711 शेतकरी आणि रक्कम 573 कोटी आणि संभाव्य कर्जमाफीचा फायदा 46 लाख 864 हजार शेतकर्‍यांना 117 कोटी रुपये मिळू शकतो.

LEAVE A REPLY

*