नगर जिल्ह्यातील 2 लाख 869 शेतकर्‍यांना कर्जमाफी

0

आकडेवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर

मुंबई –  राज्य सरकारने राज्यात शेतकर्‍यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केली आहे. कोणत्या जिल्ह्यात किती शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळणार? याबाबत छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतील (कर्जमाफी) जिल्हानिहाय लाभार्थी शेतकर्‍यांची सविस्तर आकडेवारी मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्या ट्विटर हँडलवरुन जाहीर केली आहे. यात सर्वाधिक कर्जमाफीचा लाभ बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मिळणार आहे.नगर जिल्हा चौथ्या क्रमांकावर असून 2 लाख 869 शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ होणार आहे. यात पुनर्गठन, नियमित कर्ज भरणारे तसेच ओटीएसचा लाभ घेणारे शेतकरी समाविष्ट नाहीत.

मुंबई आणि उपनगरात शेतकर्‍यांना कर्जमाफी दिल्याचे यादीत दिसत आहे. या शेतकर्‍यांची जमीन कदाचित मुंबईलगत असण्याची शक्यता आहे, या शेतकर्‍यांनी मुंबईतील बँकांमधून कर्ज घेतले असण्याची शक्यता आहे. कर्जमाफी करताना प्रत्यक्ष चौकशीत सगळया गोष्टी स्पष्ट होतील, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्ध केलेल्या यादीत कर्जमाफीचे सर्वाधिक लाभार्थी हे बुलडाणा जिल्ह्यातील आहेत. तर सर्वात कमी फायदा हा पालघर जिल्ह्याला झालाय. बुलडाण्यात 2 लाख 49 हजार 818 शेतकर्‍यांना कर्जमाफीचा फायदा झालाय तर पालघर जिल्ह्यात मात्र, याच कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची संख्या अवघी 918 इतकी आहे.

प्रस्तावित कर्जमाफीचे सर्वाधिक लाभार्थी असलेले जिल्हे
बुलडाणा- 2,49,818
यवतमाळ- 2,42,471
बीड – 2,08,480
अहमदनगर – 2,00,869
जालना – 1,96, 463
प्रस्तावित कर्जमाफीचे सगळ्यात कमी लाभार्थी असलेले जिल्हे
पालघर- 918
रायगड- 10,809
ठाणे- 23,505
सिंधुदुर्ग- 24,447
नंदुरबार – 33,556

मुंबईत शेतकरी आले कुठून? मुंबईत शेतकरी आले कुठून?
कर्जमाफीच्या या लाभार्थी यादीत चक्क मुंबईसह उपनगरातील 813 शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ झाल्याचं आढळून आलंय. पण मुंबईसारख्या मेट्रोसिटीत शेतकरी नेमके आले कुठून हा प्रश्न दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनाही पडलाय. याबाबत त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना देखील चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे आता जाहीर झालेल्या प्रस्तावित लाभार्थी यादीत नेमके खरे शेतकरी किती आहेत याची व्यवस्थित चौकशी करूनच मगच कर्जमाफी दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

लाभार्थ्यांची खोटी आकडेवारी : काँग्रेस लाभार्थ्यांची खोटी आकडेवारी : काँग्रेस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्रीच्या अंधारात कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची खोटी आकडेवारी जाहीर केली असून त्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. मुंबईमध्येही लाभार्थी शेतकरी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आधी जाहीर केले, त्यानंतर त्यांनीच याबाबत आश्चर्य व्यक्त केले ही जनतेची साफ फसवणूक असल्याचेही सावंत यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर म्हटले आहे. मुख्यमंत्री यांनी कर्जमाफीची घोषणा करताना राज्यातील 89 लाख शेतकर्‍यांना याचा लाभ होणार असून 40 लाख शेतकर्‍यांचा सात बारा कोरा होणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनी ट्विट केलेल्या यादीत आता ते 36 लाख 10 हजार शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होणार असल्याचे सांगत आहेत. ही आकडेवारीही फसवी असून त्यांनी जाहीर केलेल्या यादीत 2008 पासूनच्या शेतकर्‍यांचा समावेश असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.

 

LEAVE A REPLY

*