नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे चालू पिककर्ज माफ करा

0

चंद्रशेखर घुले ; राष्ट्रवादी काँग्रेसच्या माळीचिंचोरा शाखेचे उद्घाटन

भेंडा (वार्ताहर)- अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करून त्या पिकासाठी घेतलेले चालू पीककर्ज माफ करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केली आहे.
नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेस शाखेचे उदघाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्ञानेश्‍वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, कार्याध्यक्ष दादा गंडाळ, युवक तालुकाध्यक्ष नवनाथ साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम मिसाळ, प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे, ज्ञानेश्‍वरचे संचालक जनार्दन पटारे, अशोकराव मिसाळ, युवक जिल्हा उपाध्यक्ष सोपान महापूर, शंकरराव भारस्कर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री.घुले म्हणाले, समाजात भांडणे लावून राजकीय पोळी भाजण्याचे व शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडण्याचे काम भाजपा सरकार करत असून फसवणूक केल्याने या सरकारवर शेतकरी व युवकांची प्रचंड नाराजी आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे त्वरीत करावेत, त्या पिकाचे चालू कर्जमाफी करून शेतकयांना नव्याने कर्ज मिळावे व जायकवाडी पुनर्वसित शेतकऱयांना मिळालेल्या वर्ग दोनच्या जमिनींवरील पोटखराब्याच्या नोंदी रद्द कराव्यात या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.
विठ्ठलराव लंघे म्हणाले, तालुक्यातील तरुणांची दिशाभूल करून नेतृत्वावर आरोप करण्याचा उद्योग सुरू आहे. तालुक्यात राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी चंद्रशेखर घुले पाटील यांनी निट बसविलेली आहे.शरद पवार हेच शेतकर्‍यांचे सुख दुःख वाटून घेणारे नेतृत्व आहे.पक्षाला उभारी देऊन पक्षाचे काम जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम होणार आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, युवक तालुकाध्यक्ष नवनाथ साळुंके, प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे, नेवासा शहर अध्यक्ष गफूर बागवान, जनार्दन पटारे, काकासाहेब पुंड यांनीही मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष भिमराज शेंडे यांनी प्रास्तविक केले. माळीचिंचोरा शाखाध्यक्ष कैलास चौधरी, खंडू खंडागळे, प्रवीण गोडसे, अर्जुन चौधरी, शेखर वाघमारे, शिवाजी धानापुणे, बाबासाहेब चिंधे, रवींद्र चिंधे, प्रकाश वाघमारे, विलास मोटे, काकासाहेब पुंड, बाळासाहेब आहिरे, रामभाऊ धानापुणे, इब्राहिम सय्यद आदीं यावेळी उपस्थित होते. भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले. रमेश शेंडे यांनी आभार मानले.

नेवासा हा राष्ट्रवादीच्या विचाराचाच तालुका आहे. तालुक्यातील जनता राष्ट्रवादीबरोबरच असून केवळ पुढार्‍यांमध्ये फूट झालेली आहे. 61 निकष लावून सरसकट कर्जमाफीची घोषणा ही केवळ लबाडाचे आमंत्रण आहे.
पांडुरंग अभंग
माजी आमदार

LEAVE A REPLY

*