पिंपरी निर्मळच्या 154 शेतकर्‍यांना सव्वा कोटी कर्जमाफीचा लाभ मिळणार

0
पिपंरी निर्मळ (वार्ताहर) – पिंपरी निर्मळ सेवा सोसायटीच्या 154 शेतकर्‍यांना सव्वा कोटीची कर्ज माफी मिळणार असून नियमित कर्ज भरणारे 183 शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र झाले आहेत.
राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी घोषित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजने अंतर्गत पिंपरी निर्मळ सेवा सोसायटीच्या 300 च्यावर शेतकर्‍यांना कर्ज माफी, पुनर्गठण तसेच प्रोत्साहन अनुदानाचा लाभ होणार असून ही सव्वा कोटीच्या वर जाणार आहे.
शासनाच्या कर्जमाफी योजनेप्रमाणे 2009 ते जून 2016 पर्यंतच्या दीड लाख रुपयापर्यंतच्या कर्ज माफीसाठी 117 शेतकरी पात्र असून त्यांना जवळपास 80 लाखांचा लाभ होणार आहे. 2016 मध्ये कर्जाचे पुनर्गठण करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या 37 असून त्यांना जवळपास 33 लाख रुपंयांचा लाभ होणार असून नियमित कर्ज भरुन 15 हजार ते 25 हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदानासाठी 185 शेतकरी पात्र आहेत. या शेतकर्‍यांना जवळपास 25 लाखांपर्यंत रक्कम मिळणार आहे.
त्यामुळे पिंपरी निर्मळ सेवा सोसायटीच्या 300 सभासदांना जवळपास सव्वा कोटीच्या वर कर्जमाफी मिळणार आहे. सातत्याने अनेक वर्षांपासूनच्या दुष्काळाचा सामना करीत आपली कर्ज न थकविता नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना शासनाने अत्यंत तुटपुंजी मदत प्रोत्साहन अनुदानाच्या रूपाने केली आहे.त्यामुळे या शेतकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण आहे.

त्यामुळे नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांनी बँकेकडे पाठ फीरविली असून संस्थेच्या सव्वा पाच कोटी कर्ज वितरणापैकी अवघा सव्वा कोटीचा वसूल 31 जुलैअखेर झाला असून कर्ज वसुलीला चालू वर्षी मोठा फटका बसला आहे. शासनाने नियमित कर्ज भरणारांसाठी प्रोत्साहन रकमेत भरीव वाढ करण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

पिपरीं निर्मळ सेवा सोसायटीच्या कर्जमाफीसाठी दीड लाखा पर्यंत 117 शेतकरी, 2016 मध्ये पुनर्गठण केलेले 37 शेतकरी, तसेच नियमित कर्ज भरणारे 185 शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असून त्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची गरज आहे. गावातिल महा सेतू कार्यालय तसेच ग्रामपंचायतीच्या ‘आपले सरकार’ केद्रांवर फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. पिपरीं निर्मळ सेवा सोसायटीच्या कर्जमाफीसाठी दीड लाखा पर्यंत 117 शेतकरी, 2016 मध्ये पुनर्गठण केलेले 37 शेतकरी, तसेच नियमित कर्ज भरणारे 185 शेतकरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असून त्यांनी यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची गरज आहे. गावातिल महा सेतू कार्यालय तसेच ग्रामपंचायतीच्या ‘आपले सरकार’ केद्रांवर फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.- दत्तात्रय भवरसचिव, पिंपरी निर्मळ विकास सोसायटी

LEAVE A REPLY

*