चाहत्याचा दारूच्या नशेत अभिनेता अर्जुन कपूरवर हल्ला!

0

उत्तराखंडमध्ये अभिनेता अर्जुन कपूरवर एका चाहत्याने दारूच्या नशेत हल्ला केला.

या हल्ल्यात अर्जुनला किरकोळ दुखापत झाली. सध्या अर्जुन ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटात बिझी आहे. याच चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली.

उत्तराखंडच्या पिथौरागड येथे चित्रपटाचे शूटींग सुरु होते. याचेळी कमल कुमार नामक व्यक्ति अर्जुनच्या व्हॅनिटी व्हॅनजवळ आला. मी तुझा खूप मोठा चाहता आहे, असे म्हणत त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. अर्जुनने पुढे येत, त्याच्याशी हात मिळवला. पण याचदरम्यान या चाहत्याने अर्जुनचा हात जोरात पिरगाळला. यानंतर या चाहत्याला लगेच ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वत:ला अर्जुनचा चाहता सांगणारी कमल कुमार पेशाने वाहनचालक आहे. अर्जुनवर हल्ला केला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. या घटनेनंतर कमलची कार जप्त करण्यात आली असून त्याच्यावर १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

‘संदीप और पिंकी फरार’मध्ये अर्जुन कपूर पोलिस कर्मचाºयाच्या भूमिकेत आहे. त्याच्यासोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहे.

LEAVE A REPLY

*