Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थ्यांच्या कन्येस 50 हजार

Share

नाशिक । प्रतिनिधी

मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे आणि मुलींच्या जन्मदारात वृध्दी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या जिल्ह्यातील 69 कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाणार आहे.पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या कन्येस प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची मासिक बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेचा आढावा घेण्यात आला.सन 2018-19 या आर्थिक वर्षात 69 कन्या ‘भाग्यश्री’ ठरल्या आहेत. या योजनेत एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे 50 हजार रुपये कायम ठेव म्हणून दिले जातात.

तसेच दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास प्रत्येक मुलीच्या नावे 25 हजार रुपये दिले जाणार आहेत.
बालकल्याण समितीच्या सभेत ग्राम बालविकास केंद्र (व्हीसीडीसी) केंद्राचा आढावा घेतला असता जिल्ह्यात 10 हजार 709 बालके ग्राम बालविकास केंद्रात दाखल झाले आहेत.

या सभेला समिती सदस्य कविता धाकराव, सुनिता सानप, रेखा पवार, गणेश अहिरे, महिला व बालकल्याण अधिकारी दत्तात्रय मुंडे, आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.दिनेश पाटील आदी उपस्थित होते.
.
तालुकानिहाय लाभार्थी

इगतपुरी-4, नाशिक शहर-53, पेठ-2, सिन्नर-3, निफाड-3 यांसह नाशिक, बागलाण, दिंडोरी, उमराळे येथील प्रत्येकी एका लाभार्थ्यांची निवड झाली आहे. या सर्व लाभार्थ्यांना 34 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!