सहा लाखांच्या बनावट नोटांसह तिघे ताब्यात

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – शहरातील प्रकाश कोडम (वय 54) यांना 50 हजार रुपयांच्या बदल्यात एक लाख रुपये किंवा त्याच किमतीची वस्तू देण्याच्या बहाण्याने लुटणार्‍या दोघांसह एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे सहा लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
नगर शहरातील प्रकाश कोडम (रा. नित्यसेवा सोसायटी, वसंत टेकडी, सावेडी) यांना एका महिलेचा फोन आला की, तुम्ही 50 हजार रुपये दिले तर त्या बदल्यात तुम्हाला एक लाख रुपये किंवा त्याच किमतीची वस्तू देण्यात येईल.
संशय अल्याने कोडम यांनी याबाबतची माहिती कॅम्प पोलीस ठाण्यात येऊन पोलीस निरीक्षक देशमाने यांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड, एस. पी. कवडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलीस नाईक राजू सुद्रिक, पोलीस कॉन्स्टेबल राहुल द्वारके, योगीराज सोनवणे, ज्ञानेश्‍वर शिंदे, मोहिनी कर्डक,
संपदा तांबे यांच्या पथकाने तपास करून संबंधित महिला (रा. झोपडी कॅण्टीन) तसेच तिच्या सोबत असणारा गणेश नाबाडे (रा. पिंपरी चिंचवड, सध्या रा. झोपडी कॅण्टीन) यांच्याकडून सुमारे दोन लाख 62 हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या.
तसेच त्यांचा अन्य साथीदार शिवाजी खेडकर (रा. सणसवाडी, पुणे) याला देखील साडेतीन लाख रुपयांच्या बनावट नोटांसह पकडले. प्रकाश कोडम यांच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

*