Friday, May 3, 2024
Homeनगरबनावट लग्न लावत सव्वादोन लाखांना चुना

बनावट लग्न लावत सव्वादोन लाखांना चुना

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

लग्नाला मुलगी मिळत नसलेल्या मुलाचे मध्यस्थांनी लग्न झालेल्या मुलीबरोबर खोटे लग्न लावून दोन लाख वीस हजारांना चुना लावला. परंतु पळुन जाण्याच्या तयारीतील मुलीसह दोघांना नागरीकांनी पकडून पोलीसांच्या हवाली केले. तर चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

सदिप प्रल्हाद डाखोरे (रा.खडकी ता बार्शीटाकळी जि. अकोला), प्रशांत योगेंद्र गवई, (बुलढाणा), अर्चना रामदास पवार (मुकुंदवाडी, औरंगाबाद) व संगीता पाटील (संपुर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील पोपट दगडू तानवडे यांनी सुपा पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यानुसार मुलाच्या विवाहासाठी ते मुलगी शोधत असताना एजंट संदिप प्रल्हाद डाखोरे याची भेट घेतली. त्याने त्यांना दोन मुली दाखवल्या.

यातील औरंगाबाद येथले जालना रोडवरील कोमल नावाची मुलगी दाखवली. परंतु मुलीला आई वडील नाहीत. मुलीचा संभाळ मावशी करते तेव्हा लग्नसाठी आडीच लाख रूपये द्यावे लागतील असे सांगीतले. अखेर दोन लाख वीस हाजार रूपये देण्याचे ठरले. 20 मे 2022 रोजी हा विवाह संपन्न झाला. 7 जुन रोजी तानवडे यांच्या घरी आलेल्या एका व्यक्तीने आपण प्रशांत योगेद्र गवई असून तुमच्या मुलाशी विवाह झालेली कोमल ही माझी पत्नी आहे.

आमचे 14 वर्षापुर्वी लग्न झाले असून तिचे खरे नाव अर्चना रामदास पवार असल्याचे सांगितले. दरम्यान मुलगी पळुन जाण्याच्या तयारीत असताना त्या दोघांना पकडून सुपा पोलीसांच्या हवाली केले. सबंधीत दोघे व एजंट यांच्या विरुध सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खंडेराव शिंदे व त्याचे सहकारी करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या