Friday, May 3, 2024
Homeनगरबनावट सोनेतारण प्रकरणी सराफासह बाराजण अटकेत

बनावट सोनेतारण प्रकरणी सराफासह बाराजण अटकेत

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेतील बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणात तब्बल 21 जणांवर बँकेची फसवणूक केल्याबद्दल

- Advertisement -

राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात सराफासह बाराजणांना अटक करण्यात आली असून उर्वरित दहाजण पसार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दिली.

काल राहुरी न्यायालयात या आरोपींना हजर केले असता त्यांना दि.26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, सराफ अरविंद विनायक नांगरे, संदीप बाळासाहेब अनाप, राजेंद्र भाऊसाहेब थोरात, राजेंद्र शिवाजी हारदे, मुनिर अब्दुल शेख, संदीप हरिभाऊ सजन, प्रेमकुमार संपतकुमार डुक्रे, अविनाश आबासाहेब नालकर, नवनाथ गोपीनाथ पठारे, दत्तात्रय विठ्ठल सिनारे, सचिन केशवराव निधाने, शिवाजी संपत संसारे, यांना अटक करण्यात आली आहे. ही फसवणूक तब्बल 34 लाख 45 हजार पाचशे रुपयांची आहे. राहुरी पोलिसांनी या प्रकरणात बारा आरोपींना अटक केली आहे. तर आणखी दहा आरोपी सध्या पसार आहेत.

जिल्हा बँक शाखेतील नागरे या सराफामार्फत सोने तारणावर कोट्यवधी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले होते. मात्र, बनावट सोनेतारणाचे पितळ उघडे पडल्यानंतर जिल्हा बँकेचे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर हे दागिने सोडवून घेऊन कर्ज भरण्याचे आवाहन बँक प्रशासनाकडून करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने अशा कर्जदारांवर कायद्याचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे गुन्हे दाखल होताच दहा आरोपी पसार झाले. तर बाराजणांना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी गुरनं. 2075/2020 प्रमाणे भा.दं.वि.कलम 406, 420, 468, 471, 34 प्रमाणे प्रविणकुमार पाराजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सराफ अरविंद विनायक नांगरे, रा.सोनगाव, संदिप बाळासाहेब अनाप रा.सोनगाव, दिंगबर धोंडीराम जाधव, रा.सोनगाव, राजेंद्र भाऊसाहेब थोरात रा. सात्रळ, शिवाजी लक्ष्मण अनाप, भास्कर भाऊसाहेब अंत्रे, गणेश कैलास वांदे, राजेंद्र शिवाजी हारदे, मुनिर अब्दुल शेख, संदिप हरिभाऊ सजन, प्रेमकुमार संपतकुमार डुक्रे, ज्ञानदेव पंढरिनाथ शिंदे, संजय रखमाजी बेलेकर, अविनाश आबासाहेब नालकर, नवनाथ गोपीनाथ पठारे, अक्षय तुकाराम गडगे, दत्तात्रय विठ्ठल सिनारे, दत्तात्रय सखाराम शेळके, सचिन केशवराव निधाने, शिवाजी संपत संसारे, दत्तात्रय विठ्ठल वाणी रा. झरेकाठी ता.संगमनेर या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या