फेसबुकवर महिलेची बदनामी कोपरगावच्या तरूणास अटक

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – फेसबुक अकाऊंटवर एका महिलेबाबत अश्‍लिल मजकूर प्रसारीत करुन बदनामी करणार्‍या कोपरगावच्या एका तरुणास सायबर शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्यास चौकशीकामे देण्यात आले आहे. संदीप गौतम मेहेरखांब (रा. कोळगाव थडी, ता. कोपरगाव) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी याने फेसबुकवर बनावट खाते तयार केले होते. त्या माध्यमातून एका महिलेशी मैत्री केली होती. काही दिवस महिलेशी चॅट करून महिलेविषयी अश्‍लिल मजकूर फेसबुकवर टाकला होता. तसेच वेगवेगळे संदेश पाठवून महिलेची बदनामी केली होता. याप्रकरणी महिलेल्या फिर्यादीनुसार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना सायबर क्राईशी संबंधीत असल्यामुळे त्याचा तपास सायबर शाखेचे पोेलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किर्ती पाटील यांनी केला.
आरोपीचे लोकेशन घेऊन तांत्रिकदृष्ट्या तपास करण्यात आला. आरोपी हा कोपरगाव तालुक्यातील कोळगाव येथील असल्याची माहिती मिळताच सायबर शाखेच्या पथकाला त्यास अटक केली. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला आहे. या घटनेच्या पुढील चौकशीसाठी त्यास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिलांच्या फसवणुका होत आहेत. नुकतेच एका मंत्र्याने फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करुन अत्याचार केल्याची उघड झाला आहे. नगर जिल्ह्यात देखील अशा प्रकराच्या घटना घडल्या आहेत. मात्र सक्षम यंत्रणा नसल्यामुळे हे आरोपी मोकाट झाले आहे. आता मात्र पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी जिल्ह्याचा पदभार घेतल्यापासून सायबर शाखा क्रियाशील झाली आहे. आजवर त्यांनी सायबर गुन्ह्यातील अनेक आरोपी अटक केले आहेत. त्यामुळे अशा गुन्ह्यांना आळा बसणार आहे. ही कारवाई डी. पी. कोळी, राहुल गुंड, अरुण सांगळे, आकाश भैरट, प्रशांत राठोड या पथकाने केली.

LEAVE A REPLY

*