Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

अबब! फेसबुकला ३४ हजार कोटींचा दंड; काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Share

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

केंब्रिज अॅनालिटिकाच्या डेटा लीक प्रकरणामध्ये फेसबुकच्या युजर्सची खासगी माहितीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून फेसबुकला ३४ हजार २८० कोटी रुपयांचा दंड अमेरिकेने ठोठावला आहे.

फेसबुकच्या दंडाची बातमी अमेरिकेतल्या विविध माध्यमांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशन या संस्थेने केले आहे.

फेसबुकच्या माध्यमातून ८ कोटी ७० लाख युझर्सच्या खाजगी डेटाचा गैरवापर करण्यात आला. हीच माहिती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत देण्यात आली असा आरोप केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीवर होता.

दरम्यान, फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांनी आमचा विश्वासघात झाल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी डेटा चोरी प्रकरणात जे काही खर्च होतील किंवा दंड भरावे लागतील त्यासाठी आम्ही 3 अब्ज डॉलर्स बाजूला काढून ठेवले असल्याचे झुकेरबर्ग यांनी म्हटले होते.

अमेरिकेच्या न्याय विभागाकडून जर या दंडावर शिक्कामोर्तब झाले तर हा एखाद्या टेक्नोलॉजी कंपनीला ठोठावलेला सर्वात मोठा दंड असेल असेही म्हटले जात आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!