चोंडी घाटात भरधाव ट्रकची समोरासमोर धडक; चालकाचा होरपळून मृत्यू

0

मनमाड(प्रतिनिधी): भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन ट्रकची समोरा समोर धडक होऊन या अपघात दोन्ही ट्रकने पेट घेतल्याची घटना मनमाड पासून जवळ चोंडी घाटात घडली.

अपघातामुळे पुणे-इंदौर महामार्गावरील वाहतूक झाली ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच मनमाड व मालेगावच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

अपघातात ट्रक ड्रायव्हर भाजल्याचे समजते. अपघातामुळे मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदौर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्या नंतर पोलिसांनी क्रेन आणून जळालेली दोन्ही ट्रक रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

पुणे- इंदौर या मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक वाढली असून त्यात अवजड वाहनांची संख्या जास्त आहे. शिवाय खाजगी लक्झरी बसेस ही मोठ्या प्रमाणात या मार्गावरून भरधाव वेगाने धावतात.

त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रवाशांसाठी सध्या हा मार्ग मृत्यूचा सापळा ठरत आहे.

LEAVE A REPLY

*