Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउद्यापासून राज्यात कडाक्याची थंडी

उद्यापासून राज्यात कडाक्याची थंडी

मुंबई –

महाराष्ट्रात सोमवारपासून (21 डिसेंबर) कडाक्याची थंडी असेल अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

- Advertisement -

उत्तरेकडून राज्यात थंड वार्‍याचा प्रवाह वाहू लागला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत चांगलाच गारठा वाढला आहे. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट होऊ लागली आहे.

या कोरड्या वातावरणामुळे नववर्षाच्या सुरुवातीला राज्यात चांगलाच गारठा वाढणार आहे. तर मुंबईतही सोमवारपासून तापमान आणखी घसरण्यास सुरुवात होईल. यामुळे मुंबईकरांना थंडीचा अनुभव घेता येणार आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात ऐन थंडीतही अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई ठाण्यासह उपनगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. त्यानंतर तपामानात घट झाली होती.

या आठवड्यात बर्‍यापैकी मुंबईसह उपनगरात तसेच राज्यातील काही शहरांमध्ये गारवा जाणवत होता. राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पण ढगाळ वातावरणामुळे राज्यात फारशी थंडी जाणावत नव्हती. मात्र आता उत्तर भारतातून थंडीचा तडाखा महाराष्ट्राच्या दिशेने येण्यास सुरुवात झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या