Friday, April 26, 2024
Homeदेश विदेश१७ मे पर्यंत लॉकडाऊन कायम; रेड झोनमध्ये कुठलीही सवलत नाही

१७ मे पर्यंत लॉकडाऊन कायम; रेड झोनमध्ये कुठलीही सवलत नाही

नवी दिल्ली : देशात तिसऱ्यांदा करोनाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. दोन आठवड्यांनी लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याची माहिती आज गृहमंत्रालयाच्या एका आदेशाद्वारे देण्यात आली आहे. यामुळे येत्या ३ मे रोजी संपणारे लॉकडाऊन आता १७ मेपर्यंत चालूच राहणार आहे.

देशातील करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. याप्रश्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. आजच केंद्राकडून तीन झोन जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये करोनाच्या प्रादुर्भावानुसार काही अंशी सुविधा सुरु होणार आहेत.

- Advertisement -

रेड झोनमध्ये मात्र कुठल्याही अत्यावश्यक सेवा सोडून कुठल्याही प्रकारची सेवेसाठी सुट देण्यात आले नसल्याचे समजते.

ग्रीन झोन मध्ये काही प्रमाणात सूट मिळणार आहे. मात्र, याठिकाणी मॉल, थिएटर, शाळा बंदच राहणार आहेत. तसेच विमानसेवा, रेल्वेही बंदच ठेवण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या