Friday, May 3, 2024
Homeनाशिकराणेनगर बोगद्यात प्रायोगिक तत्वावर दुभाजक

राणेनगर बोगद्यात प्रायोगिक तत्वावर दुभाजक

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

राणेनगर बोगद्यातील Ranenagar tunnel वाहतूक Traffic सुरळीत करण्यासाठी नाशिक शहर वाहतूक शाखा क्रमांक 3 च्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर डिव्हायडरचे नियोजन Divider planning on an experimental basis केल्याने येथील वाहतूक सुरळीत झाल्याचे चित्र वाहनधारकांना बघायला मिळत आहे.

- Advertisement -

राणेनगर बोगद्यात डिव्हायडर नसल्याकारणाने येथे नेहमी छोटे-मोठे अपघात व वाहनधारकांत वादावादीचे प्रकार होत असत. याचा सारासार विचार करून आता नाशिक शहर वाहतूक पोलीस कार्यालयाअंतर्गत विभाग 3 च्या वतीने तात्पुरत्या स्वरुपात प्रायोगिक तत्त्वावर डिव्हायडरचे हे काम करण्यात आले आहे. त्यामुळे किरकोळ स्वरुपाचे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याने याबाबत वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून राणेनगर बोगद्यात सकाळ व सायंकाळच्या वेळी वाहतूककोंडी होते. त्यामुळे छोटे-मोठे अपघात व त्याचे स्वरूप भांडणात होत असे. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी डिव्हायडरचे नियोजन करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

– छाया देवरे , स.पो.नि. वाहतूक

- Advertisment -

ताज्या बातम्या