‘एक्झॉटीक स्पा धाड’ प्रकरणी गाळेमालकाचा आज होणार उलगडा

0
नाशिक : गेल्या दोन दिवसांपूर्वी शहरातील कॉलेजरोडलगत  असणाऱ्या एक्झॉटीक स्पावर पोलिसांनी धाड टाकली होती. यात १३ तरुण तरुणींना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली.

हा गाळा नेमका कुणाच्या मालकीचा आहे याचा उलगडा आज होणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राजू भुजबळ यांनी देशदूतशी बोलतांना दिली.

गाळ्याचे सर्व करारपत्रके आणि इतर महत्वाची माहिती आज पोलिसांच्या हातात मिळणार आहे. त्यातून संबंधित गाळामालकाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, स्पा प्रकरणात संबंधित बिल्डींग किंवा गाळा कुणाच्या मालकीचा आहे. या चर्चेला शहरात उधाण आल्यानंतर संबंधित गालामालकवर पोलीस काय कारवाई करतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

या बातमी संबंधित आणखी बातम्या :

‘एक्सॉटिक स्पा’वरील धाडीनंतर परेश सुराणा अवतरला फेसबुकवर

कॉलेजरोडवरील मॉलमध्ये चालायचे स्पाच्या नावाने अनैतिक व्यवसाय; पोलिसांचा छापा

 

LEAVE A REPLY

*