पांढऱ्या पेशी वाढविणाऱ्या ड्रॅगनफ्रूटची नाशिककरांना भूरळ

0

नाशिक (वा.प्र.) ता. ११ : नाशिकच्या बाजारात वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या ड्रॅगन फ्रूटची यंदाही चांगली आवक झाली असून नाशिककर या फळाला पसंती देत आहेत.

पांढर्‍या रक्तपेशीची वाढ करणारे म्हणून या फळाला विशेष महत्त्व आहे.

निवडुंगावर येणार्‍या या फळाची शेती सर्वप्रथम पश्चिम महाराष्ट्रातील माळशिरस येथील एका गावात २००९ साली प्रगतीशील शेतकरी आनंदराव जाधव यांनी सर्वप्रथम केली.

कोरडवाहू जमिनीवर येणार्‍या या फळाच्या उत्पादनासाठी विशेष सिमेंटचे खांब लावावे लागतात आणि वरच्या भागात गोलाकार चकती लाऊन त्यातून या निवडुंगाला खाली लोंबते ठेवावे लागते.

सध्या सोलापूरसह औरंगाबाद परिसरातील कोरडवाहू जमिनीवर या फळाची प्रयोगशील लागवड होत आहे. त्यातून कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

मगजदार असलेले हे फळ मधुर-आंबट, स्ट्रॉबेरीच्या चवीचे असून पांढर्‍याशुभ्र गरामध्ये काळ्या मोहरीच्या आकाराचे ठिपके सुरेख दिसतात. सध्या नाशिक शहरात ५० ते ६० रुपये नग या प्रमाणे या फळाची विक्री होत आहे.

ओले अंजीर, संत्री, मोसंबी, अननस, चिकू, पीच, सिताफळे यासह इतरही फळांनी बाजारपेठेत सप्तरंगी फळ उत्सव बहराला आहे.

LEAVE A REPLY

*