Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रजायकवाडी पक्षी अभयारण्याला विदेशी पक्ष्यांची प्रतिक्षा

जायकवाडी पक्षी अभयारण्याला विदेशी पक्ष्यांची प्रतिक्षा

पैठण | आशिष तांबटकर | प्रतिनिधी

देश विदेशातील विविध जातींच्या पक्षांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणच्या प्रसिद्ध जायकवाडी अभयारण्यास विदेशी पाहुणे पक्षांची प्रतिक्षा करावी लागत असून गेल्या दोन वर्षांपासून धरण पुर्ण भरत असल्याने पक्षांना राहण्यासाठी व खाण्यासाठी भक्ष्य व निवारा मिळत नसल्याने पक्षांनी अभयारण्याकडे पाठ फिरवली असल्याचे मत पक्षीमित्रांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

जायकवाडी धरणाच्या निर्मितीनंतर जायकवाडी धरणाकडे विदेशी पक्षांचे आगमन सुरु झाले होते‌. हिवाळ्याच्या ऑक्टोबर ते मार्च याकाळात विदेशी पक्षांचे अभयारण्य वास्तव असते. धरणातील पाणथळ व दलदलीचा भाग पक्षांना पोषक असतो. येथे पक्षांचे भक्ष्य असलेले छोटे मासे, किडे आदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने दिवसेंदिवस यात विदेशी पाहुणे पक्षांच्या संख्येत मोठी वाढ होत गेली. जायकवाडी धरणात लाखोंच्या संख्येने असलेल्या या पक्षांच्या थव्यांनी पक्षीमित्रांना भुरळ घातली.

यंदा मात्र जायकवाडी पक्षी अभयारण्याचे वैशिष्ठे असलेला फ्लेमिंगो आणखी आढळला नाही. धरण पुर्ण भरल्यामुळे पाणथळ व दलदलीची जागा राहीली नाही त्यामुळे थंडी पडली असतानांही पाहुण्या पक्षांची संख्या रोडावली आहे. ल्गाॅसी आयबिस (चिमना कंकर), बार हेडेड गुज (राजहंस), स्पाट बिल्ड डक (धनवर), काॅमन टेल (सुंदर बटवा), काॅमन कुट(चांदी), ब्लॅक विंग स्टिल्ट, काही प्रमानात आढळत आहेत.

पेन्टेड स्टाॅर्क, व्हाईट आयबिस, ब्लॅक आयबिस ही पक्षी आढळले नाहीत. विदेशी पाहुण्या पक्षांच्या वर्दळीमुळे अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या या अभयारण्यातील पक्षांचे निरीक्षण करण्यासाठी विदेशी पक्षीमित्रांनी या काळात मूक्कामी वास्तव करुन निरीक्षण केले. विदेशी पक्षांची रेलचेल व पर्यटकांचे माहेरघर बनलेल्या जायकवाडी धरणाच्या आतील बाजूला शासनाने पक्षी अभयारण्यास म्हणून घोषितही केले आहे. मात्र आता या अभयारण्याकडे विदेशी पक्ष्यांनी गेल्या दोन वर्षांपासून जायकवाडी धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने पाणथळ व दलदलीचा भाग उपलब्ध नसल्याने या पक्षांना भक्ष्य व निवारा मिळत नसल्याने त्यांनी अभयारण्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे विदेशी पाहुणे पक्षांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पक्षीमित्रांचा हिरमोड होत असून चिंता व्यक्त केली जात आहे.

जायकवाडी पक्षी अभयारण्यात विदेशी पाहुणे पक्षांना भक्ष्य व निवारा मिळत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून संख्या झपाट्याने घटली आहे. फ्लेंमिंगो पक्षी जायकवाडीवर ऊशिराने आढळुन येत असुन मागील वर्षी जुलैमध्ये ही आढळुन आले होते, धरण पूर्ण भरल्यामुळे पाणथळ व दलदलीचा भाग उपलब्ध नसल्याने या पक्षांना भक्ष्य व निवारा नसल्याने त्यांनी अभयारण्याकडे पाठ फिरवली आहे.

पक्षीमित्र प्रा. संतोष गव्हाणे

- Advertisment -

ताज्या बातम्या