Type to search

Breaking News Featured maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

एक्सिट पोल: भाजपचा वाजणार डंका!

Share

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान संध्याकाळी सहा वाजता संपले असून संध्याकाळी साडे सहा वाजता एक्झिट पोल जाहीर झाले आहे. 23 मे रोजीच्या मतमोजणीपूर्वी एक्झिट पोलकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नरेंद्र मोदींची पुन्हा सत्ता येणार का, भाजपा बहुमताचा आकडा गाठणार का, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कशी कामगिरी करणार, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात काय होणार, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या महाआघाडीला जनता पाठिंबा देणार का, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या एक्झिट पोलमध्ये केला आहे. महाराष्ट्रात पुन्हा फडणवीस सरकार का कॉग्रस-राष्ट्रवादीचे सरकार येणार यांची उत्सुकता सध्या लागली आहे. भाजपचा वाजणार डंका!

महाराष्ट्रातील 48 जागाबाबात महाराष्ट्रासह देशाला उत्सुकता आहे. प्रसार माध्यमांनी केलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रात महायुतीला सार्वाधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

ABP माझा या वाहिनीचा एक्झिट पोल

उत्तरप्रदेश-
सपा- 24, बसपा-30, भाजपा+-22, कॉग्रेस+- 02

महाराष्ट्र
भाजप+ – 17, शिवसेना- 17, कॉग्रेस+- 04, राष्ट्रवादी- 09, वंचित-00, स्वाभिमानी- 01, इतर-01

TV9 ने केेलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रात भाजप शिवसेना महायुतीला 34 जागा मिळतील अशी शक्यता आहे. तसेच काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 14 जागा मिळण्याची शक्यता आहे.

चॅनेल               भाजप               काँग्रेस                इतर
सी वोटर            287                128                127
जन की बात       305                124                 113
चाणक्य             340                  70                 113
व्हीएमआर          306                132                 104

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!