मनपा अभियंता पालवेंवरील कारवाई शिथील; मुंडे-पालवेंचा आयुक्त मुंढेंना फोन?

0
नाशिक | महापालिकेतील बजेटमधील कामांची माहिती न देता आल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कार्यकरी अभियंता सचिन हिरे व राजेश पालवे यांना बैठकीतच निलंबित करीत असल्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आयुक्त मुंढे यांना मंत्री महोदया पंकजा मुंढे-पालवे यांचा फोन आला आणि पालवे यांचे निलंबन करण्याऐवजी त्यांना नोटीस पाठवली अशी चर्चा मनपाच्या गोटात सुरु होती.

नियमित निपक्षपातीपणे कारभार करणाऱ्या, आयुक्त मुंढे यांनी मंत्री महोदयांच्या फोनवरून कारवाई का शिथिल केली असावी अशी चर्चा सध्या नाशिक शहरात सुरु आहे.

महापालिकेची काल(दि.१७) बैठक होती. या बैठकीत बजेटमधील कामांची माहिती कार्यकारी अभियंता हिरे आणि पालवे यांना देता आली नाही. आयुक्त मुंढे यांनी या दोघांना हिसका दाखवत बैठकीतच निलंबनाचे आदेश दिले होते.

त्यानंतर बैठकीची मधली सुट्टी झाली. मंत्री महोदया पंकजा मुंढे-पालवे यांनी थेट आयुक्त मुंढे यांना फोन करून संवाद साधल्याची चर्चा आहे.

त्यानंतर हिरे यांच्यावरील निलंबनाची कारवाई आयुक्त मुंढे यांनी आहे तशीच ठेवली तर पालवे यांच्यावरील कारवाई मात्र शिथील करत केवळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

या चर्चेमुळे महापालिका वर्तुळात चर्चा सुरू असून कुणालाही न जुमानणाऱ्या आयुक्त मुंढे यांनी कार्यकारी अभियंता पालवे यांच्याविरोधातील कारवाईची चर्चा मात्र सगळीकडेच सुरु होती. मुंढे यांच्या कारवाईनंतर अधिकारी-कर्मचार्‍यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

आयुक्त मुंढेच्या कारवाईचा धडका सुरूच; कार्यकारी अभियंता हिरे निलंबित अन् पालवेंना नोटीस

LEAVE A REPLY

*