Exclusive Video : बंधाऱ्याचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम ; ठेकेदाराची लबाडी उघड

0

सिन्नर तालुक्यातील आदिवासी भागात औढेवाडी येथे सुरु असलेले बंधाऱ्याच्या बांधकामात ठेकेदाराची लबाडी उघड झाली आहे. दगड टाकून बांधकाम केले जात असल्याची घटना भाजपच्या पंचायत समिती सदस्यांनी उघडकीस आणली.

जिल्हा परिषदेमार्फत हे काम सुरु असल्याचे समजते. पंचायत समितीच्या भाजप सदस्यांनी एकत्र येत ठेकेदाराने केलेली लबाडी उघड केली असून या व्हिडीओमध्ये ठेकेदाराने जसे काम करायला सांगितले तसे आम्ही केले असून त्यात आमचा काहीही दोष नसल्याचे येथील काम करणारे मजूर सांगतांना दिसत आहेत.

या घटनेचा व्हिडीओ आमच्या प्रतिनिधीने शिताफीने कॅमेरयात कैद केला असून यामुळे ठेकेदाराचा लबाडीपणा उघडकीस आला आहे.

LEAVE A REPLY

*