विशेष मुलाखत : प्रत्येक शहराचे ब्रॅण्डींग करणार – क्रेडाईचे राज्य अध्यक्ष शांतीलाल कटारिया

0

देशदूत विशेष मुलाखत

नाशिक : राज्यातील सुमारे 41 शहरांमध्ये क्रेडाईच्या शाखा आहेत. या परिस्थितीत प्रत्येक शहरातील महत्वाचे प्रकल्प अन्य शहरातही कसे होवू शकतील यासाठी क्रेडाई प्रयत्नशील राहील. याशिवाय पर्यावरण, आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येक शहर सायकलींगसाठी पुरक कसे करता येईल, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास मत क्रेडाई संस्थेच्या राज्याचे अध्यक्ष शांतीलाल कटारीया यांनी व्यक्त केला.

शासन आणि बांधकाम व्यवसायिक या दोन्हींचा दुवा म्हणून क्रेडाई संस्था काम करते. अशावेळेस बांधकाम व्यवसायिकांना विविध परवानग्या मिळवितांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे भविष्यात मानवस्पर्श विरहीत परवानग्या ऑनलाईन कशा उपलब्ध होतील यासाठी शासनाला सुचविण्यात येईल. परवानगी मिळवणे ही वेळखाउ प्रक्रिया असल्याने त्यात शासनाचे, बांधकाम व्यवसायिकांचे श्रम, पेसे खर्च होतात.

याचा परिणाम शासकीय महसूल, कर यावरही होतो. जमीन बिगरशेती करतांना काही कालबाहय कायदे लागू केले जातात. त्या कायद्यांमध्ये बदल करून वतनाविना जमीन असेल तर ती आपोआप बिगरशेती व्हावी यासाठी शासनाला सुचविण्यात येईल. रेडीरेकनर दरामुळे शासन तसेच बांधकाम व्यावसायिक यांच्यात कायम संघर्ष होतो. या रेडीरेकनर दराविषयी शासनाला विश्वासात घेत ही प्रक्रिया शास्त्रशुध्द करण्यात यावी यासाठी क्रेडाईकडून प्रयत्न करण्यात येतील अशी माहितीही कटारिया यांनी दिली.

रेडीरेकनर विषयी काही मार्गदर्शक तत्वे, मुल्यांकन, पुर्नमुल्यांकन करण्याबाबत सूचना करण्यात येतील. यात वैचारिक संघर्ष टाळतांनाच जनसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याबाबत शासनाला योग्य ते पर्याय सुचविले जातील . याबाबत यापूर्वीही दोनदा क्रेडाईची बैठक मंत्रालयात झालेली आहे.

याशिवाय आरक्षणांचा प्रश्नही मोठा आहे. वेगवेगळी आरक्षणे टाकतांना त्यासाठी एक समितीची रचना करण्यात यावी. जेणेकरून आरक्षणाचा वापर कसा यापेक्षा नेमक्या कोणत्या कारणासाठी होईल याबाबत सदर समिती बदल सुचवेल. त्यासाठीही के्रेडाई आग्रही आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पर्यावरणाचा प्रश्न. नागरीकरण वेगाने होत असतांना शहरांच्या विकासात रिंग रोड, वाहतूक व्यवस्थेचा विचार, चांगले रस्ते याबाबतही के्रडाई विचार करेल. जेणेकरून नागरिकांचे जीवनमान सुसहय होईल.

परवडणारी घरे हेच लक्ष्य : मोठया शैक्षणिक संस्था सर्वच शहरात कशा पोहोचतील, जेणेकरून त्या शहरात विद्यार्थी शिकून कायम वास्तव्य करेल यासंदर्भात शासनाला सुचविण्यात येईल. जंर नागरीकरण वाढले तरच घरे विकली जातील. बांधकाम व्यवसाय वाढेल. परवडणारी घरे निर्माण करण्यावर भविष्यात आमचा भर राहील.
शांतीलाल कटारिया, अध्यक्ष, क्रेडाई, महाराष्ट्र राज्य

LEAVE A REPLY

*