Exclusive : तब्बल ३९ वर्षांनंतर सापडली तांबट लेन मधील रहाड

0

देशदूत डिजिटल वृत्त

नाशिक, ता. १३ :  जुन्या नाशिकमध्ये पारंपरिक रहाड खोदून त्यात रंग खेळण्याची प्रथा प्रसिद्ध आहे. यंदा तांबट लेनमधील एक जुनी रहाड तब्बल ३९ वर्षांनी खोदण्यात आली आहे.

दोन ही रहाड खोदण्याला सुरुवात झाली होती. उद्यापर्यंत हे खोदकाम पूर्ण होणार आहे. या रहाडीचा आकार १८ बाय १८ फूटाचा असून खोली १६ फुटाची आहे.

प्रथेप्रमाणे रहाड पुजेचा मान तांबट गल्लीतील एका कुटुंबियाकडे होता. मात्र सध्या त्यांच्यापैकी कुणीच हयात नाहीत. शिवाय दरवर्षी परिसरातील कुणाचातरी मृत्यू होत असल्याने रहाड खोदण्याचे रहित होत होते.

यंदा मात्र येथील येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज लोणारी आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी ही रहाड खोदण्याचा निर्णय घेतला. त्यांना नगरसेवक गजानन शेलारे यांचे प्रोत्साहन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात देशदूत डिजिटलला मनोज लोणारी म्हणाले, ‘त्यांचे वडील प्रभाकर लोणारी आणि काका प्रकाश काळे यांच्याकडून रहाडीच्या जागेची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी खोदकामाला सुरुवात केली. पहिले काम वाया गेले. दुसऱ्या ठिकाणी मात्र दगडी चिरा लागल्याने हीच ती रहाडीची जागा असे वाटून खोदकाम केल्यानंतर रहाड सापडली.’

या कामासाठी परिसरातील मुस्लिम युवकांचेही सहकार्य लाभल्याचे श्री लोणारी यांनी सांगितले. त्यामुळे होळी व रंगपंचमीनिमित्त सामाजिक सलोखा वाढण्यास मदतच होणार आहे.

ragpanchami-rahad

LEAVE A REPLY

*