Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : वर्षाच्या अखेरीस राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई; ७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Share

नाशिक | प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यात मद्य तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्पिरिटने भरलेले दोन टॅंकर आज (दि.२८) पहाटे सापळा रचून जप्त करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक पथकाने चौघा संशयितांना ताब्यात घेत, सुमारे 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही टॅंकर हरियाणाकडून कर्नाटकात जात असताना, पथकाने ही कामगिरी केली.

अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे  निरीक्षक ऋषिकेश फुलझळके यांना परराज्यातून येणाऱ्या वाहनातून मोठ्याप्रमाणात अतिशुद्ध असे मद्यार्क असलेले स्पिरिटची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार पथकाने शनिवारी (दि.२७) रात्रीपासूनच महामार्गावरील सांगवी शिवारात सापळा रचला होता. त्यावेळी रविवारी (ता.28) पहाटे तीन वाजेच्या सुमारास हरियाणाकहून कर्नाटककडे जाणाऱ्या दोन टॅंकरमधून पाईंट हायमास्ट स्ट्रिट लाईटखाली संशयास्पदरित्या काही द्रवपदार्थ काढला जात असल्याचे निदर्शनास आले.

याचवेळी दबा धरून बसलेल्या राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने छापा मारत दोन्ही टॅंकरच्या चालकांना ताब्यात घेतले. एचआर 61 ए 9889 या टॅंकरमध्ये 21 हजार ब.लि. अतिशुदध मद्यार्क, एचआर 55 एन 0691 या टॅंकरमध्ये 25 हजार ब.लि. अतिशुद्‌ध मद्यार्क, आयशर टॅम्पो एमएच 18 एए 502 मध्ये 4400 ब.लि. अतिशुदध मद्यार्क तर पीकअप एमएच 18 एए 6642 मध्ये 1600 ब.लि. अतिशुदध मद्यार्क असा 70 लाख 2 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यावेळी पथकाने संशयित धर्मबीर जिले सिंह (रा. संबोधित जिलेसिंह उमेर्वास 10, भिवानी, हरियाणा), मंजूनाथ रामअण्णा सिरंजी (रा. रामअण्णा रोट्टिगवाड, कोंकनकुरट्टी, दरवाड, कर्नाटक), ओमप्रकाश रामफल जाट्ट (रा. डीघल, जि. झज्जर, हरियाणा), परवीन धर्मवीर लसकरी (रा. लकडिया, ता. बेरी, जि. झज्जर, हरियाणा) या चौघांना अटक करण्यात आली आहे.

तर आयशर व पीकअपचे चालक वाहन सोडून पसार झाले आहेत. सदरची कामगिरी विभागाचे उपायुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ऋषिकेश फुलझळके, डी.के. मेंगाळ, ए.यू. सूर्यंवंशी, देवदत्त पोटे, एस.एस. रावते, बी.आर. नवले, एम.पी.पवार, एन.एस. गायकवाड, एस.पी. कुटे, एस.एस. गोवेकर, गोकुळ शिंदे, दीपक आव्हाड, लोकेश गायकवाड, विठ्ठल हाके, अमन तडवी, ए.व्ही. भडांगे, एस.एच. देवरे, के.एम. गोसावी, गोरख पाटील, केतन जाधव, प्रशांत बोरसे, रवींद्र देसले यांच्या पथकाने बजावली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!