Friday, May 3, 2024
Homeनगरअतिवृष्टी नुकसानभरपाईसाठी वडुलेत रास्ता रोको

अतिवृष्टी नुकसानभरपाईसाठी वडुलेत रास्ता रोको

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या रखडलेल्या नुकसान भरपाईच्या मागणीच्या पाठपुराव्यासाठी तालुक्यातील वडुले येथे मंगळवारी अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

तालुक्यातील वडुले बु, जोहरापूर,भगूर,वरुर,खरडगाव,आखेगाव ,कराड वस्ती ,या नदिकाठच्या गावांना व वाडी वस्त्यांना अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे प्रचंड नुकसान झाले नुकसानीचे पंचनामे करून पाच महिने होत आले तरी शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई अजून अनेक शेतकर्‍यांना मिळाली नाही. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त भागातील शेतकर्‍यांना प्राधान्याने ऊसतोड देण्यात यावी, असे नियम असूनही अद्याप अनेकांना ऊसतोड दिली जात नाही.

आदी मागण्यांसाठी सुमारे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसेक्रेटरी कॉ. सुभाष लांडे, ज्येष्ठ नेते कॉ. शशिकांत कुलकर्णी, संजय नांगरे, भगवानराव गायकवाड, बापूराव राशिनकर, दत्तात्रय आरे, मुरलीधर काळे ,अंजाबापू गायकवाड, वैभव शिंदे, अशोक हरदास, शंभर हरवणे, बबन सागडे, एकनाथराव डमाळ, दत्तात्रय काथवटे, रावसाहेब सागडे, बाबुलाल सय्यद आदींसह शेतकरी, कामगार, आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मंडलाधिकारी बडे यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी नुकसान भरपाईची रक्कम जमा झाल्यानंतर उर्वरीत शेतकर्‍यांना अदा करण्यात येईल असे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या