दुय्यम निरीक्षकपदासाठी 28 मे रोजी परीक्षा

0
32 केंद्रावर 9 हजार 960 परिक्षार्थी

अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगोमार्फत घेण्यात येणारी दुय्यम निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट क (पूर्व) परीक्षा 28 मे रोजी जिल्ह्यातील 32 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. यासाठी एकूण 9 हजार 960 परीक्षार्थी आहेत.

नगर शहरातील शाळा व महाविद्यालयामध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा नियोजनासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्या पार्श्‍वमूमिवर गुरुवारी नियुक्त अधिकारी व कर्मचार्‍यांची जिल्हाधिकारी कार्यालय नियोजनभवन येथे प्रशिक्षण घेण्यात आले.
सदर परीक्षेसाठी वर्ग-1 चे उपजिल्हाधिकारी सवर्गाचे 7 समन्वय अधिकारी व एक भरारीपथक अधिकारी, वर्ग-चे 32 उपकेंद्रप्रमुख, सहाय्यक-40, पर्यवेक्षक-100, सहाय्यक-62, समवेक्षक-415, लिपिक, केअर टेकर, बेलमन प्रत्येकी-32,त्रापाई-39, वाहनचालक-40 व पाणी वाटप कर्मचारी-शंभर असे एकूण 931 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शंभर मिटर परिसरात एसटीडी बूथ, फॅक्स, झेरॉक्स दुकाने सकाळी 10 ते सायं 5 पर्यत बंद ठेवण्याच्या सूचना आहेत.सदर क्षेत्रात सीआरपीसी चे कलम लागू करण्यात आले आहे. उमेदवांरानी प्रवेश पत्र संकेतस्थळावरुन घ्यावे, दुय्यम प्रवेशपत्र जिल्ंहाधिकारी कार्यालयातून मिळणार नाही.
तर, केंद्रात नो एन्ट्री
सकाळच्या सत्राच्या पेपरसाठी सकाळी 10.30 वाजेपूर्वी परिक्षार्थीनी केंद्रात प्रवेश करणे अनिवार्य आहे. वेळ झाल्यास प्रवेश मिळणार नाही.उत्तरे लिहिण्यासाठी काळ्या
शाईचा बॉलपेन वापरने आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

*